Kajol and Ajay Devgn | काजोल हिला ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्यास सक्त मनाई, अजय देवगण याने थेट

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काजोल हिने काही दिवसांपूर्वी जाहिर केले होते की, मी सोशल मीडियाला कायमचा रामराम करणार आहे. मात्र, काही दिवसांनंतर परत काजोल ही सोशल मीडियावर सक्रिय दिसली. तिने हे प्रमोशनसाठी केल्याचे लक्षात आले.

Kajol and Ajay Devgn | काजोल हिला या अभिनेत्यासोबत काम करण्यास सक्त मनाई, अजय देवगण याने थेट
| Updated on: Jul 04, 2023 | 6:00 PM

मुंबई : अजय देवगण आणि काजोल (Kajol) यांची बाॅलिवूडमधील सर्वात हिट जोडी आहे. अजय देवगण आणि काजोल यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल यांनी 1999 मध्ये लग्न केले. अजय देवगण आणि काजोल यांना दोन मुले देखील आहेत. काजोल हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये नक्कीच गाजवला आहे. काजोल हिची तगडी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काजोल तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. काजोल ही अनेकदा तिच्या विधानांमुळे चर्चेत देखील असते.

काजोल आणि अजय देवगण यांच्या जोडीपेक्षा अधिक चाहते हे काजोल आणि शाहरुख खान यांच्या जोडीवर अधिक प्रेम करायचे. काजोल आणि शाहरुख खान यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. काजोल आणि शाहरुख खान यांनी बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है हे चित्रपट एकसोबत केले आहेत.

काजोल आणि शाहरुख खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर धमाका करताना दिसली. मात्र, काजोल आणि शाहरुख खान यांच्या जोडीवर अजय देवगण हा जळत होता. इतकेच नाही तर काजोल हिला सक्त मनाई अजय देवगण याने शाहरुख खान याच्यासोबत काम करण्यास केली होती. शाहरुख खान आणि काजोल खूप चांगले मित्र होते.

एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याला याबद्दल विचारण्यात आले होते. यावर बोलताना शाहरुख खान म्हणाला होता की, अजय देवगण याने काजोल हिला अशी काही मनाई केली याबद्दल मला खरोखरच माहिती नाहीये. बहुतेक तसे काही नसावे. उद्या जर गाैरी मला असे म्हणत असेल तर तो पागलपणच आहे ना?

शाहरुख खान पुढे म्हणाला की, अजय असे काही नसेलच म्हणाला. काजोल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काजोल हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, माझी मुलगी निसा ही पापाराझी यांच्यासोबत खूप चांगला व्यवहार करते. मी कधीच तिला सांगितले नाही की, तिने कसा व्यवहार करायला हवा. कारण तिने हे सर्व अनुभवातून शिकायला हवे, असे मला कायमच वाटते.