Kangana Ranaut : ‘Sorry Hrithik’ ट्रेंडमध्ये असताना वादाची ठिणगी, एक्स – बॉयफ्रेंडवर पुन्हा भडकल्या कंगना, स्क्रिनशॉट अखेर व्हायरल

Hrithik Roshan, Kangana,Hrithik Roshan Kangana Ranaut feud, Sorry Hrithik trend, Freddy Birdy, Hrithik Roshan Instagram comment, Kangana Ranaut controversy, Saurav Das, कंगना राणौत, हृतिक रोशन,

Kangana Ranaut : Sorry Hrithik ट्रेंडमध्ये असताना वादाची ठिणगी, एक्स - बॉयफ्रेंडवर पुन्हा भडकल्या कंगना, स्क्रिनशॉट अखेर व्हायरल
Hrithik Roshan Kangana Ranaut
| Updated on: Aug 02, 2026 | 8:21 AM

Kangana Ranaut : अभिनेत्री, भाजप खासदार कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद पुन्हा इतक्या वर्षांनंतर सुरु झाला आहे. सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडियावर ‘जगला हृतिक रोशनची माफी मागायला हवी…’ ट्रेंड करत आहे… त्यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया देखील दिली. पण अभिनेत्याची प्रतिक्रिया कंगना यांना खटकली आणि त्यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेरअ करत अभिनेत्यावर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर होत असलेल्या गोंधळाच्या आहारी न जाता वस्तुस्थितीची वाट पाहावी… असं आवाहन हृतिक रोशनने सर्वांना केलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून कंगना यांनी एक कठोर शब्दांत पोस्ट करत, त्याच्यावर आगीत तेल ओतल्याचा आरोप केला.

हृतिक रोशन संबंधीत एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत कंगना यांनी स्वतःचं परखड मत मांडलं आहे. कंगना म्हणाल्या, ‘प्रिय हृतिक… मला आनंद आहे की, सबा आजाद तुझ्यासाठी एक परफेक्ट पार्टनर आहे… तु्म्ही दोघे एकत्र छान दिसता… तू एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहे आणि कोणत्या दुसऱ्या महिलेला असं प्रवृत्त करणं तुला शोभा देत नाही… याशिवाय तुला त्या लोकांनी निंदा करायला हवी, जे तुझ्या नावाचा वापर करुन मला त्रास देत आहेत. सर्वात आधी तर आगीत तेल ओतणं बंज कर आणि तुझ्या जोडीदाराला लाज वाटेल असं काहीही करु नको.. आशा आहे की, तुला शहाणपण सुचेल आणि तू अशी अनावश्यक विधानं करणं थांबवशील…’, असं देखील कंगना म्हणाल्या आहेत.

सांगायचं झालं तर याआधी हृतिक याने फ्रेडी बर्डी नावाच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिलेली.. ‘Sorry Hrithik’ ट्रेंडचा संबंध अनेकांनी हृतिक आणि कंगना यांच्या 2016 मध्ये झालेल्या वादाशी जोडला आहे. नेटकऱ्यांच्या पोस्टवर कमेंट करत हृतिक म्हणाला, ‘”मित्रा, केवळ B आता तुला आवडत नाही म्हणून A ची बाजू घेणं, हा आपल्या समाजाला भेडसावणाऱ्या एका मोठ्या सामाजिक समस्येचाच एक छोटासा भाग आहे. जोपर्यंत ही चर्चा योग्य संदर्भात आणि तथ्यांवर आधारित होत नाही, तोपर्यंत मी वाट पाहीन; कारण तोच योग्य दृष्टिकोन आहे. पण अर्थात, आता याची कोणाला पर्वा आहे, बरोबर ना?’

कंगना आणि हृतिक रोशन यांच्यातील जुना वाद

कंगना आणि हृतिक यांच्या वादाबद्दल सांगायचं झालं तर, 2016 मध्ये त्यांच्या वादाची सुरुवात झाली. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत कंगना, हृतिक याला मुर्ख एक्स म्हणालेल्या. पण अभिनेत्याने दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा फेटाळल्या होत्या. त्यानंतर दोघांच्या वादाला खरी सुरुवात धालीय त्यानंतर लिगल नोटीस देखील पाठवण्यात आली… दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले… ज्यामध्ये ईमेल्सबद्दल देखील मोठी गोष्ट समोर आली. अनेक महिने दोघांमधील वाद सुरु होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us