AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मीकांत बेर्डेंची पहिली पत्नी कशी होती, सेटवर का रंगायची त्यांचीच चर्चा? रुही बेर्डेंद्दल बोलताना अभिनेता भावूक

Laxmikant Bendre First Wife : लक्ष्मीकांत यांच्या करियरबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला फार काही माहिती आहे. लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नीबद्दल तर कदाचित कोणाला काही माहिती असेल. त्यांच्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याने मोठा खुलासा केलाय.

लक्ष्मीकांत बेर्डेंची पहिली पत्नी कशी होती, सेटवर का रंगायची त्यांचीच चर्चा? रुही बेर्डेंद्दल बोलताना अभिनेता भावूक
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे
| Updated on: Aug 02, 2026 | 10:12 AM
Share

Laxmikant Bendre First Wife : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेके लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत यांनी फक्त मराठीच नाही तर, अनेक हिंदी सिनेविश्वात देखील मोलाची भूमिका बजावली. आज लक्ष्मीकांत यांच्या करियरबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला फार काही माहिती आहे. लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नीबद्दल तर कदाचित कोणाला काही माहिती असेल. लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रुही बेर्डे असं होतं…

दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी रुही बेर्डे यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेते म्हणाले, ‘लक्ष्मीकांतची पत्नी (पहिली पत्नी रुही बेर्डे) सेटवर जेवण आणायची, फिश वैगरे असं त्या सेटवर पाठवायची… हळूहळू सर्वांना कळलं की, लक्ष्मीकांत याच्या घरातून जेवण येत आहे. त्यामुळे त्याला सगळे विचारायचे आज जेवायला काय आहे? घरी जाताना पुन्हा विचारायचे उद्या जेवायला काय असणार आहे? लक्ष्मीकांत देखील घरी जाऊन सांगायचा, उद्या हे पदार्थ बनवून पाठव… तिचं देखील शुटिंग असायचं… तरी देखील ती सकाळी उठून सर्वकाही बनवायची…’

चेतन दळवी पुढे म्हणाले, ‘तू शूटिंगसाठी दुपारी जायची… कारण तिला सकाळी हे सर्व जेवण करायला मिळायचं…’, सांगायचं झालं तर, चेतन दळवी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याच खूप चांगली मैत्री होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली.

लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे…

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या देखील मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी जवळपास 15 वर्ष संसार केला. पण एक दिवस असा आला जेव्हा रुही यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाली. तेव्हा ड्रायव्हरने रुही यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 5 एप्रिल 1998 मध्ये रुही बेंद्रे यांचं निधन झालं.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दुसरं लग्न प्रिया बेर्डे यांच्यासोबत केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे… त्यांचा मुलगा आज अभिनय विश्वात सक्रिय आहे. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 16 डिसेंबर 2004 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

Follow Us
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद