AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्त्रीधन हडपलं, चारित्र्यावर संशय, शिवीगाळ अन्..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पती-सासूविरोधात एफआयआर

टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रीने पती, सासू आणि नणंदविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत तिने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या..

स्त्रीधन हडपलं, चारित्र्यावर संशय, शिवीगाळ अन्..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पती-सासूविरोधात एफआयआर
Abhineet Kaushik and Aditi Sharma Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2026 | 10:07 AM
Share

प्रसिद्धी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अदिती शर्मा हिने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. 31 जुलै रोजी अभिनेत्रीचा पती अभिनीत कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अभिनेत्रीने त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, शिवीगाळ, तिच्या चारित्र्यावर संशय घेणं आणि तिचं स्त्रीधन (वधूचे दागिने) हडपल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार, अदितीची जून 2021 मध्ये एका ऑनलाइन अभिनयाच्या क्लासेसद्वारे अभिनीतशी भेट झाली होती. क्लासेसदरम्यान या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर सप्टेंबर 2024 पासून अदिती आणि अभिनीत हे दोघं गोरेगाव पश्चिम इथल्या एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. अखेर कुटुंबीयांच्या संमतीने दोघांनी 12 नोव्हेंबर 2024 रोजी लग्न केलं.

अभिनेत्रीकडून गंभीर आरोप

लग्नानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच पतीच्या वागण्यात बदल झाला आणि तो तिच्या कपड्यांबद्दल आक्षेप घेऊ लागला. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणं करू लागला, असा आरोप अदितीने केला. तिने असाही दावा केला की, घरखर्चात मदत करण्याऐवजी तिचा पती तिच्याकडूनच पैसे घेऊ लागला. पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 1 जानेवारी 2025 रोजी कॉफीवरून झालेल्या वादाचं रूपांतर शाब्दिक शिवीगाळात झालं. त्यानंतर तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला, तिच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करू लागला. इतकंच नव्हे तर तिचा मोबाईल फोन नियमितपणे तपासू लागला आणि वेगळ्या खोलीत झोपू लागला.

अदितीने पुढे असाही आरोप केला आहे की, तिला तिच्या आई-वडिलांशी बोलण्यापासून रोखण्यात आलं होतं. अदितीने तिच्या सासूवर आरोप केला आहे की त्यांनी सोन्याची साखळी, अंगठ्या, हिऱ्याची अंगठी, मंगळसूत्र आणि बांगड्या यांसारखे तिचे लग्नातील दागिने स्वतःकडे ठेवले आणि वारंवार विनंती करूनही ते परत केले नाहीत. जेव्हा तिची सासू आणि नणंद हा वाद मिटवण्यासाठी जोडप्याच्या घरी गेल्या, तेव्हा त्यांनी तिच्या पतीची बाजू घेतली आणि तिचा आणखी छळ केला, असंही तिने पुढे तक्रारीत म्हटलंय. अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारे, गोरेगाव पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपांची चौकशी सुरू केली आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा