कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, कंगना म्हणते ‘मोदीजी कायदे त्वरित लागू करा…!’

| Updated on: Jan 27, 2021 | 2:06 PM

देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला होता.

कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, कंगना म्हणते मोदीजी कायदे त्वरित लागू करा...!
Follow us on

मुंबई : देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला होता. मात्र, या ट्रॅक्टर मार्चला हिंसक वळण मिळाले होते त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर कंगना रनाैतने (Kangana Ranaut )शेतकरी आंदोलनाविरोधात अनेक ट्विट केले. आज कंगनाने एक ट्विट करत सरकारकडे नवीन कृषी कायदे लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता कंगनावर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली आहे. (Kangana Ranaut demands implementation of agricultural laws as soon as possible)

कंगनाने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. कंगना म्हणाली होती की, जेंव्हा मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटलं होत त्यावेळेला या शेतकऱ्यांचे समर्थन करत मोठ्या 6 ब्रॅण्डने माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते आणि त्या शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत ते सुध्दा दहशदवादी आहेत.

कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

कंगना धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे.

संबंधित बातम्या : 

योगाची ताकद समजावणारी गर्भवती करिना ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता OTT वर एन्ट्री करण्यास ‘मास्टर’ सज्ज, अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज!

(Kangana Ranaut demands implementation of agricultural laws as soon as possible)