चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता OTT वर एन्ट्री करण्यास ‘मास्टर’ सज्ज, अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज!

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापथी विजय आणि विजय सेतुपतीचा 'मास्टर' (Master) हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:25 PM, 27 Jan 2021
चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता OTT वर एन्ट्री करण्यास 'मास्टर' सज्ज, अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज!

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापथी विजय आणि विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ (Master) हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 13 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आणि 3 दिवसात चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा गल्ला केला होता. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘मास्टर’ आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. तमिळ अ‍ॅक्शन चित्रपट मास्टर 29 जानेवारीला अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. (Master movie will be screened on OTT platform)

तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, मास्टर हा चित्रपट 13 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट. 29 जानेवारीला अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. मास्टर प्रदर्शित होण्याच्या अगोदरच चित्रपटाच्या काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपट रिलीज होऊपर्यंत त्या क्लिप कोणीही शेअर करू नये असे भावनिक आवाहन प्रेक्षकांना केले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी ट्विट केले होते की, मास्टर हा चित्रपट तयार करण्यासाठी आम्हाला तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागला आहे. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि थिएटरमध्येच मास्टर हा चित्रपट बघायला तुम्हाला आवडेल. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कृपया आपल्याकडे आलेल्या व्हिडिओ क्लिप कोणाही शेअर करू नका. सुपरस्टार विजयचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.

संबंधित बातम्या : 

अंकिताचं ठरलं! जुनं विसरुन नवा संसार थाटायचा, मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल?

वर्षातील सगळ्यात मोठा चित्रपट, भारत पाकिस्तान युद्धाचा थरार दाखवणार, निखिल द्विवेदीची घोषणा!

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

(Master movie will be screened on OTT platform)