अंकिताचं ठरलं! जुनं विसरुन नवा संसार थाटायचा, मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल?

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या कनेक्टमध्ये असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:15 AM, 27 Jan 2021
अंकिताचं ठरलं! जुनं विसरुन नवा संसार थाटायचा, मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल?

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या कनेक्टमध्ये असते. ती काय करते?, तिचं शेड्युल कसं असतं? या पुढचे अपकमिंग प्रोग्राम काय आहेत? याची माहिती ती आपल्या फॅन्सला सोशल मीडियावरुन देत असते. मात्र, सध्या सोशम मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले आहेत त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली आहे. यामुळे आता चाहते असा अंदाजा लावताना दिसत आहे की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे. (Will Ankita Lokhande and Vicky Jain get married?)

चाहेत तिला विकी जैनसोबत लग्न करणार आहे का असा प्रश्न देखील विचारताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे आणि तिच्या बहीणीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी वर काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे अंकिताच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

एका टीव्ही सिरियलमध्ये त्यांची ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांचर प्रेमात झालं. मग गाठीभेटी वाढल्या साहजिकच एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं. काही वर्षांपूर्वी अंकिता सुशांतच्या पाटन्याच्या घरी गेली होती. यावेळी तिथे सुशांतचे सगळे कुटुंबीय होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही अंकिता आणि सुशांतच्या नात्याची कल्पना होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अंकिता अनेक वेळा ट्रोल झाली आहे. तिने कुठलाही फोटो शेअर केला की सुशांतचे फॅन्स तिला ट्रोल करत असतात. त्याच्या मृत्यूला अंकिताच जबाबदार आहे, असा दावा करत सुशांतचे फॅन्स अंकिताला ट्रोल करतात. मात्र अंकितानेही अनेक वेळा त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय.

संबंधित बातम्या : 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीकडून घोडचूक; नेटिझन्सनी झापलं

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

शेतकरी आंदोलनाचा विरोध करणं कंगनाला महागात, 6 ब्रॅंडने रद्द केली कॉन्ट्रॅक्ट!

(Will Ankita Lokhande and Vicky Jain get married?)