Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलाल (Natasha Dalal) सोबत लगीनगाठ बांधली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:09 PM, 26 Jan 2021
Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, 'व्वा क्या बात है...'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला आहे. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलाल (Natasha Dalal) सोबत लगीनगाठ बांधली आहे. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यात लग्नसोहळ्यात फक्त 50 जण सहभागी झाले होते. वरुणने स्वतः लग्नाचे फोटो शेअर केले होते. एवढेच नाही तर त्यांनी हळद आणि मेहंदीचे फोटोही शेअर होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. (Photos of Varun Dhawan-Natasha Dalal of Roka Ceremony go viral on social media)

पण यादरम्यान, दोघांचे रोका सेरेमनी फोटोही समोर आले आहेत, जे त्यांच्या चाहत्यांनी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वरुणने हलक्या निळा रंगाचा शर्ट आणि ब्लेझर घातले होते. तर नताशाने साडी घातलेली दिसत आहे. दोघांच्याही हातात नारळ दिसत आहे. आणि दोघांच्या गळ्यात हार दिसत आहेत. यासोबतच या दोघांचा केक कापतानाचा एक फोटोही आहे. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर आता त्यांचे रिसेप्शन कुठे होणार, यावर अनेक चर्चा समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण आणि नताशा या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन पुढील आठवड्यात मुंबईत ठेवले जाणार आहे.

येत्या 2 फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्शन आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. हे रिसेप्शन पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या रिसेप्शनला संपूर्ण बॉलिवूड सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुख खान, कॅटरीना कैफ, जॅकलीन फर्नांडिस, श्रद्धा कपूर यांसारखे कलाकार सहभागी होऊ शकतात.

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

संबंधित बातम्या : 

शेतकरी आंदोलनाचा विरोध करणं कंगनाला महागात, 6 ब्रॅंडने रद्द केली कॉन्ट्रॅक्ट!

Sooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना!

(Photos of Varun Dhawan-Natasha Dalal of Roka Ceremony go viral on social media)