शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका

Kangana Ranaut case : तिन्ही खटले मुंबई-महाराष्ट्रातून हिमाचल प्रदेशला ट्रान्सफर करण्याची मागणी कंगना आणि तिच्या बहिणीने याचिकेत केली आहे.

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका
कंगना रणौत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेलने (Rangoli Chandel) मुंबईतील तीन खटले हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ट्रान्सफर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme court) याचिका दाखल केली आहे. तिन्ही खटले मुंबई-महाराष्ट्रातून हिमाचल प्रदेशला ट्रान्सफर करण्याची मागणी कंगना आणि तिच्या बहिणीने याचिकेत केली आहे. (Kangana Ranaut, Rangoli Chandel move Supreme Court seeking transfer of four criminal cases Mumbai to Himachal Pradesh)

कंगना आणि रंगोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे, त्यांच्यावर मुंबईत तीन खटले सुरु आहेत. मात्र आपल्याला शिवसेना नेत्यांकडून धोका आहे. जर मुंबईत या खटल्याची सुनावणी झाली तर भडास काढण्यासाठी शिवसेना नेते टोकाची पावलं उचलू शकते, असं कंगनाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.

कंगनाविरोधात खटले 

मुंबईतील वकील अली कासिफ खान यांनी कंगनाविरोधात एक खटला दाखल केला आहे. तर दुसरा खटला गीतकार जावेद अख्तर यांचा मानहानीचा आहे. तिसऱ्या खटल्यात कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात दाखल केला आहे.

कर्नाटक हायकोर्टाकडून खटला रद्द करण्यास मनाई

दरम्यान, मधल्या काही काळात कंगना रनौत प्रचंड वादात होती. कृषी कायद्यावरुन आक्षेपार्ह ट्विट केल्याने तिने वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे कंगनावर कर्नाटकातही FIR दाखल करण्यात आला होता. कंगनाने कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल करुन, FIR रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी कंगनाला दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला होता.

जावेद अख्तर मानहानी खटल्यात वॉरंट जारी

दरम्यान, गीतकार जावेद अख्तर मानहानी खटल्यात, अंधेरी कोर्टाने कंगनाविरोधात वॉरंट जारी केलं. सातत्याने कंगनाला चौकशीसाठी पोलिसात हजर राहायला बजावूनही ती न आल्याने तिला हे वॉरंट धाडण्यात आलं.

संबंधित बातम्या

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना विरोधात वॉरंट जारी , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

(Kangana Ranaut, Rangoli Chandel move Supreme Court seeking transfer of four criminal cases Mumbai to Himachal Pradesh)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI