जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना विरोधात वॉरंट जारी , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:18 PM, 1 Mar 2021
जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना विरोधात वॉरंट जारी , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

मुंबई : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत त्यांची बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला होता. याप्रकरणी आता अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून कंगना विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. (Court issues bailable warrant against Kangana Ranaut)

1 फेब्रुवारी 2021ला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत पुढील म्हणजेच 1 मार्चला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.  याप्रकरणाच्या सुनावणीसाठी जावेद अख्तर वेळेपूर्वीच आपल्या वकिलासोबत न्यायालयात हजर झाले होते. मात्र, कंगनाने न्यायालयात हजरी न लावल्यानं महानगरदंडाधिकाऱ्यांनी कडक पावलं उचलंत कंगनाविरोधात जामीनात्र वॉरंट जारी केलं आहे.

26 मार्चला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कंगनाला बजावण्यात आले आहेत. आजच्या सुनावणीसाठी कंगनाच्यावतीने तिच्या वकिलांनी न्यायालयात हजेरी लावली होती.
या सर्व प्रकरणामध्ये जेंव्हा कंगनाला समन्स पाठवण्यात आला होता. त्यावेळी कंगनाने ट्विट करत म्हटंले होते की, आज परत एक समन्स आला आहे. तुम्ही मला तुरूंगात टाका आणि माझा छळ करा तरीही मी संघर्ष करेल, पाहिजे तर माझ्यावर 500 गुन्हे दाखल करा.

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते.

त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती. कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले होते. कंगना रनौतच्याविरोधात जावेद अख्तरने मानहानीचा दावा दावा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या : 

‘सालार’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कोण कोण झळकणार ‘या’ चित्रपटात…

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय…

Video : श्रीदेवीच्या ‘नैनों में सपना’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

(Court issues bailable warrant against Kangana Ranaut)