AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय…

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे.

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय...
| Updated on: Mar 01, 2021 | 3:27 PM
Share

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि तेथीच तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. आई झाल्यानंतरचा पहिलाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Kareena Kapoor shared the first post-delivery photo on social)

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

हा फोटो शेअर करताना करीनाने लिहिले की, चाहत्यांना तिने मिस केले आणि पुढे हॅलो देखील तिने लिहिले आहे. यापूर्वी 2016मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला होता. यात त्याच्यासोबत लहान इब्राहीमही दिसत होता. ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प’, असे कॅप्शन या फोटोसाबत लिहले होते. त्यामुळे करीनाला पुन्हा मुलगाच होणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती जिने गरोदरपणाच्या शेवटपर्यंत काम केले आहे. अनेकदा करीना इव्हेंट्सला हजर राहायची. तर कधी पत्रकारांशी ती संवाद साधायची. प्रेग्नंसीच्या काळात करीनाने घरात बसून न राहता करीना मैत्रीणींसोबत आऊटिंगही केले होते.  करीना मैत्रिणी मलायका आणि अमृता अरोरासोबत Tip & Toe Nail Club या स्पाबाहेर दिसल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Video : श्रीदेवीच्या ‘नैनों में सपना’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

सनी लिओनीने फोटो शेअर करत विचारले ‘माझ्याशी लग्न कराल का?, चाहता म्हणाला…

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!

(Kareena Kapoor shared the first post-delivery photo on social)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.