Kangna Ranaut : रामजन्मभूमी दर्शनासाठी जायचं होतं, साडी देण्यास प्रख्यात बॉलिवूड डिझायनरचा नकार – कंगना रानौतचा मोठा आरोप

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री-डिझायनरने तिला तिच्या ब्रँडची साडी देण्यास नकार दिला होता असा खुलासा कंगना राणौतने नुकताच केला होता.

Kangna Ranaut :  रामजन्मभूमी दर्शनासाठी जायचं होतं, साडी देण्यास प्रख्यात बॉलिवूड डिझायनरचा नकार - कंगना रानौतचा मोठा आरोप
कंगना रानौत
| Updated on: Jan 19, 2026 | 10:04 AM

प्रसिद्ध अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रानौत पुन्हा एकदा बॉलीवूडवाल्यांवर भडकलेल्या दिसत आहेत. संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान यांनी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात एकत्र काम करण्यास काय चित्रपटासाठी भेटण्याही नकार दिल्याचा खुलास नुकातच कंगना यांनी केला होता. आता त्यांनी एक भली-मोठ्ठी बोस्ट लिहून बी-टाउन मधील फेमस डिजायनर मसाबा गुप्ता हिच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मसाबाने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिचे कपडे अनेक वेळा दिले, पण जेव्हा (कंगनाने) रामजन्मभूमी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी(मसाबाकडे) साडी मागितली तेव्हा तिने थेट नकार दिल्याचा खुलासा कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

कंगना रानौत यांची पोस्ट

अभिनेत्री- खासदार कंगना रानौत यांनी सोशल मीडिया हँडल X वरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटचवर एक मोठ्ठी नोट लिहिली.” जेव्हा एखादा सेलिब्रिटी विशिष्ट ब्रँडचे कपडे घालतात, तेव्हा ते डिझायनर खूप खुश होतात, उत्साहित असता तुम्ही मसाबा किंवा तिच्या ब्रँडच्या हँडलवर हे फोटो वापरताना पाहिले आहेत का? हे फोटो इंटरनेटवर सर्वत्र पसरले होते. ती हे फोटो का वापरत नाही किंवा स्टायलिस्ट तिला टॅग का करत नाही हे तुम्ही समजावून सांगू शकाल का?” असं तिने विचारल.

ते कपडे वापरू देण्यास मसाबाने दिला नकार

त्यापुढे कंगना यांनी लिहीलं की. “त्यावेळी माझा “तेजस” हा चित्रपट रिलीज होणार होता, म्हणून मी रामजन्मभूमी दर्शनसाठी जाणार होते.”तेजस” च्या इव्हेंटसाठी जिने मला स्टाइल केलं मी तिलाच रिक्वेस्ट केली की या (रामजन्मभूमी दर्शन) ट्रीपसाठीही तिने मला मदत करावी. अनेक स्टायलिस्ट आणि डिझायनर्सनी मला त्यांच्या हँडलवरून बंदी घातली आहे याची मला पर्वा नाही, पण या विशिष्ट घटनेने मला खूप जास्त त्रास झाला, कारण मसाबाने माझ्या (चित्रपटाच्या) प्रमोशनसाठी स्टायलिस्टला कपडे पाठवले होते. पण ते (कपडे) रामजन्मभूमी (इव्हेंटसाठी) साठी आहेत, हे जेव्हा मसाबाला कळलं तेव्हा तिने स्टायलिस्टला थेट सांगितलं की ते कपडे वापरू नयेत ” असा आरोप कंगना रानौत यांनी केला.

 

“ती स्टायलिस्ट खूप दयाळू आणि चांगली होती, तिला इतकी लाज वाटली की तिने मला गुप्तपणे सांगितलं की मसाबा किंवा तिच्या ब्रँडला टॅग करू नका आणि तिने साडीचे पैसे स्वतःच्या खिशातून दिले आहेत असंही ती म्हणाली. मला हे सगळं कळलं तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. मी तयार झाले होते आणि रामजन्मभूमी येथे जात होते. पण ते सगळं सहन करणं खूप कठीण होतं. द्वेष, कटुता, भेदभाव, हे खूप वाईट आहे. त्याबद्दल विचार करूनही मला कसंतरी होतं” अशा शब्दांत कंगना यानी त्यांचा राग व्यक्त केला.