AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील कर्नाटकचे डीजी, स्वत: अभिनेत्री; तरीही केली 15 किलो सोन्याची तस्करीत

एका अभिनेत्रीला १५ किलो सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. या अभिनेत्रीचे वडील हे कर्नाटकचे डीजी आहेत.

वडील कर्नाटकचे डीजी, स्वत: अभिनेत्री; तरीही केली 15 किलो सोन्याची तस्करीत
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2025 | 5:42 PM
Share

कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दुबईहून सोने घेऊन ती बंगळुरू विमानतळावर उतरली होती. डीआर अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान तिच्याकडे सापडलेले १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले. रान्या ही कर्नाटकचे डीजी रामचंद्र राव यांची मुलगी असून वडिलांच्या प्रभावाचा फायदा घेऊन ती तस्करी करत होती असे म्हटले जात आहे.

सध्या डीआरआयच्या पथकाने रान्याला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या ही पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याच्या आईने रामचंद्र राव यांच्याशी दुसरे लग्न केले आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्याने यापूर्वी कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक होता ‘माणिक्य.’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता रान्याला तस्करी करताना अटक झाली आहे.

दुबईहून आणले सोने

रान्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून दुबईहून भारतात सोन्याची तस्करी करत होती. दरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांना रान्याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर डीआरआयचे अधिकारी विमानाच्या आगमनाच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचले आणि दुबईहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करु लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी रान्याची तपासणी सुरु करताच तिने सर्वप्रथम वडिलांचे नाव सांगत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

१२ कोटी रुपयांचे सोने जप्त

रान्या राव ही डीजींची मुलगी असताना देखील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा तपास सुरु ठेवला. अधिकाऱ्यांनी रान्याचे कपडे तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, तिच्या कपड्याच्या आतील भागात 14.8 किलो सोन्याचा थर असल्याचे समोर आले.डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रान्या रावकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिक आहे. आता डीआरआयने या रॅकेटशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू केला आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.