AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider Movie: सीमा हैदर हिची ‘लव्हस्टोरी’ येणार मोठ्या पडद्यावर; सिनेमाचा पहिला पोस्टर हैराण करणारा

Seema Haider Movie: पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदर हिचा प्रवास दिसणार मोठ्या पद्यावर, सिनेमाच्या पहिल्या पोस्टरसोबतच मोठी अपडेट समोर... सीमा हैदर हिच्या सिनेमाची सर्वत्र चर्चा

Seema Haider Movie: सीमा हैदर हिची 'लव्हस्टोरी' येणार मोठ्या पडद्यावर; सिनेमाचा पहिला पोस्टर हैराण करणारा
| Updated on: Aug 18, 2023 | 11:05 AM
Share

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : मोठ्या पडद्यावर अनेक एकापेक्षा एक ‘प्रेमकथा’ चाहत्यांच्या भेटीस आल्या… पण आता पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदर हिची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर हिच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची चर्चा रंगत आहे. आता सीमाच्या सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सिनेमाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, सिनेमातील पहिलं गाणं देखील प्रदर्शनासाठी सज्ज आहे. २० ऑगस्ट रोजी सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित होणार आहे.

सीमा हैदर आणि नोएडातील सचिन मीना यांच्या प्रेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. निर्माता अमित जानी ही कथा पडद्यावर दाखवणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री फरहीन फालक सीमा हैदरच्या भूमिकेत दिसणार आहे. भरत सिंह यांच्या खांद्यावर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर हिच्या ‘लव्हस्टोरी’मुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

नुकताच, फायरफॉक्स प्रॉडक्शनचे निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदरवर ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाची घोषणा केली होती. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीमा हैदर हिने सिनेमात सलमान खान आणि सनी देओलसारख्या स्टार्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एवढंच नाही तर, सीमाने भारतीय नागरित्व मिळावं अशी मागणी देखील केली आहे. आता सीमा हिच्या प्रवासावर आधारित सिनेमा येणार आसल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत इशारा दिला. अमेय खोपकर यांच्या ट्विटची देखील तुफान चर्चा रंगली होती. अमेय खोपकर यांचं आक्रमक ट्विट..

अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले, ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. ’

‘देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!’ सध्या सर्वत्र खोपकर यांचं ट्विट व्हायरल होत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.