
करण जोहरचा ‘धडक 2’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी करण जोहरने त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. करण जोहर म्हणाला की तो इतरांपेक्षा खूप वेगळा होता असं नेहमीच त्याला वाटत असल्याच तो म्हणाला. त्याने सांगितले की लहानपणी कोणीही त्याच्यासोबत खेळायला येत नसे. कारण तो तितका चांगला वाटत नव्हता, तो स्पोर्टी नव्हता तसेच त्याची चालण्याची, बोलण्याची पद्धतही सर्वांपेक्षा वेगळी होती.
करण जोहर त्याच्या बालपणाबद्दल काय बोलला?
एका मुलाखतीत करण जोहरने त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगताना त्याच्या बालपणीच्या गोष्टींबद्दल तसेच काही कटू आठवणींबद्दल सांगितले. तो म्हणाला “मला माझ्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळे वाटायचं. 80 च्या दशकात, मला माहित नाही की माझे डोके कसे होते कारण मला समजत नव्हते की मी कसा आहे. मला एवढंच माहित होतं की मी खूप वेगळा आहे.”
करण म्हणाला की तो इतरांपेक्षा वेगळा होता
करण जोहर पुढे म्हणाला, “मला लहानपणी हे वारंवार सांगण्यात यायचं की मी मुलासारखं असायला हवं त्यापेक्षा जास्त मुलीसारखा होतो. कारण मी मुलींसारखंच चालत असे, धावत असे आणि बोलत असें असे सगळे मला म्हणायचे. माझ्या आयुष्यातील निवडी, माझे छंद, सर्वकाही वेगळे होते.”
मुलांना करणसोबत खेळायचे नव्हते.
करण पुढे म्हणाला “आम्ही पूर्वी अपार्टमेंटमध्ये राहत होतो. अपार्टमेंटमधील सर्व मुले संध्याकाळी खाली खेळायला जायची. मला फक्त त्यांच्यासोबत राहायचे होते.खेळायचे होते, मला फुटबॉल संघाचा भाग व्हायचं होतं. मला क्रिकेट खेळायचं होतं. पण कोणीही मला त्यांच्यात घ्यायचे नाही कारण मी तितका चांगला नव्हतो. मी तितका स्पोर्टी नव्हतो. मी तितका मर्दानी किंवा तसा पुरुष नव्हतो. त्या वयात मला फक्त त्या मुलांसोबत त्यांच्यातलं बनून राहायचं होतं. माझी स्वप्ने खूप नंतर आली.”