AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात मदतीसाठी पुढे सरसावला करण जोहर, ‘धर्मा’च्यावतीने लोकांच्या मदतीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आजकाल भीषण स्वरुप धारण करताना दिसत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे. या विषाणूमुळे किती तरी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोना काळात मदतीसाठी पुढे सरसावला करण जोहर, ‘धर्मा’च्यावतीने लोकांच्या मदतीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय!
करण जोहर
| Updated on: May 07, 2021 | 11:27 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आजकाल भीषण स्वरुप धारण करताना दिसत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे. या विषाणूमुळे किती तरी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांमध्ये भीती वाढत असताना कोरोनाची भीषण परिस्थिती पाहून काही सेलेब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही (Karan Johar) या यादीमध्ये सामील झाला आहे (Karan Johar Dharma production social media pages dedicate to corona vaccination information).

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेपोटीझममुळे बराच काळ वादात सापडला होता. अलीकडेच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना 2’ मधून आऊट केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. पण, या वादाच्या वलयाला बाजूला सारत करण जोहर लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

धर्मा प्रोडक्शन ‘या’ प्रकारे करणार लोकांची मदत

धर्मा प्रोडक्शन्सची सोशल मीडिया पेज आता कोरोना विषाणू संबंधित लसीकरण प्रक्रिया आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकतेच्या माहितीसाठी वापरली जातील. धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या वतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या सामाजिक व्यासपीठाचा विस्तार करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.

पाहा धर्माचे निवेदन

‘धर्मा’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आपल्याला कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेसंदर्भात काही शंका, प्रश्न किंवा मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्य समस्या असल्यास आणि त्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल तर ते पूर्ण करण्यासाठी टीम युवा आणि धर्मा टीम प्रयत्न करेल (Karan Johar Dharma production social media pages dedicate to corona vaccination information).

सेलेब्सही मदतीला आले धावून

कोरोना काळात केवळ धर्माच नाही तर यापूर्वी, जॉन अब्राहम, सलमान खान ते सोनम कपूर, भूमी पेडणेकर आणि इतर अनेक कलाकार मदत करत आहेत. हे सेलेब्स लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत.

दोस्तानात दिसणार एक नवीन चेहरा

करण जोहर पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अभिनेता कार्तिक आर्यन नुकताच धर्मा प्रोडक्शनच्या ‘दोस्ताना 2’ मधून आऊट झाला आहे. ज्यानंतर करण या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी दुसर्‍या कलाकाराच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती, करण जोहरने या चित्रपटासाठी अक्षय कुमारची मदत मागितली आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

(Karan Johar Dharma production social media pages dedicate to corona vaccination information)

हेही वाचा :

‘T Series’चे मालक बनण्यापूर्वी ज्यूसच्या दुकानात काम करायचे गुलशन कुमार, गोळ्या मारून झाली होती हत्या!

Video | ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’, कीर्तीचा हा डान्सिंग अंदाज पाहून चाहतेही म्हणाले वा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.