AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar On Kangana | भांडण संपलं ? कंगना राणौतशी पॅचअप करणार करण जोहर ? दिली हिंट

Karan Johar On Kangana : कंगना राणौतचा इमर्जन्सी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल दिग्दर्शक करण जोहरने मोठं वक्तव्य केलं आहे.

Karan Johar On Kangana  | भांडण संपलं ? कंगना राणौतशी पॅचअप करणार करण जोहर ? दिली हिंट
करण - कंगनाचं होणार पॅचअप ?Image Credit source: social media
| Updated on: Aug 22, 2023 | 3:57 PM
Share

Karan Johar Kangana Ranaut Fight : दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद जगप्रसिद्ध आहे. कंगना ही करणवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ती बर्‍याच दिवसांपासून करण जोहर याच्यावर, त्याच्या चित्रपटातून (तो) घराणेशाहीला प्रोत्साहन (Nepotism) देत असल्याचा आरोप करत आहे.

एवढेच नाही तर करणनेही कंगनासोबत काम करण्याची इच्छा नाही, असेही सांगितले होते. मात्र करणने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर करण आणि कंगनामध्ये पॅचअप झाले की काय अशीही चर्चा सुरू आहे.

कंगना राणौत हिचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून आपण तो पाहण्यास खूप उत्सूक आहोत, असे वक्तव्य करणने एका मुलाखती दरम्यान केले. तुला कोणत्याही राजकीय घडामोडींवर चित्रपट बनवायचा आहे का ? असे करणला विचारण्यात आले असता त्याने कंगनाच्या पॉलिटिकल ड्रामा फिल्म असलेल्या इमर्जन्सीचा उल्लेख केला.

कंगनाचा चित्रपट पाहण्यास उत्सुक

या प्रश्नाचे उत्तर देताना करण म्हणाला की, इमर्जन्सी हा चित्रपट बनतोय ना, मी तो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलेल्या कंगनाने करणवर टीका करत त्याला मूव्ही माफिया म्हटले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाक् युद्ध सुरू असून दोघेही एकमेकांवर टीका करत असतात.

रॉकी और रानी की प्रेम कहानी बद्दल काय म्हणाली होती कंगना ?

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा करणने दिग्दर्शित केलेला चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यावरही कंगनाने टीका केली होती. ‘ हा काय मूर्खपणा आहे ? स्वत:च्याच कामाची कॉपी केल्याबद्दल करण जोहरला लाज वाटली पाहिजे. यावर कोणी 250 कोटी कसे खर्च करू शकतात ? ‘ असा प्रश्न विचारत तिने करण जोरवर टीकास्त्र सोडले होते.

कामाबद्दल बोलायचं झालं तर रॉकी और रानी की प्रेम कहानी द्वारे करणने दिग्दर्शनात पुनरागमन केले असून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला कमावत आहे. तर कंगनाचे तेजस आणि इमर्जन्सी हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.