AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम असं असेल तर नकोच… ब्रेकअपनंतर अभिनेत्याने दुसऱ्या महिलेसोबत केली लग्नाची घोषणा; एक्स-गर्लफ्रेंडचं तर हृदयद्रावक निधन

Love Life | खरं प्रेम अखेर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच! गर्लफ्रेंडची फसवणूक करत तीन दिवसात अभिनेत्याने केली लग्नाची घोषणा; ब्रेकअपनंतर तिच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर पण..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा.

प्रेम असं असेल तर नकोच… ब्रेकअपनंतर अभिनेत्याने दुसऱ्या महिलेसोबत केली लग्नाची घोषणा; एक्स-गर्लफ्रेंडचं तर हृदयद्रावक निधन
| Updated on: Oct 14, 2023 | 2:42 PM
Share

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : प्रेम ही एक भावना असता… आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो. तेव्हा आपण फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या विचारात असतो… दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा मनात विचार देखील येत नाही. पण झगमगत्या विश्वातील एक अभिनेता असा आहे, ज्याने ब्रेकअप झाल्यानंतर गर्लफ्रेंडचा कोणताही विचार न करता विभक्त झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लग्नाची घोषणा केली. आज अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण अभिनेत्यांच्या एक्स-गर्लफ्रेंडला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली.

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेती करण पटेल (Karan Patel) आहे. करण पटेल विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात मात्र त्याने एका अभिनेत्रीची फसवणून केल्याचं अनेकदा समोर आलं.

करण पटेल याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव काम्या पंजाबी (Kamya Panjabi) आहे. काम्या पंजाबी हिने देखील अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा करण आणि काम्या यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.

टीव्ही विश्वातील सर्वात पॉव्हरफुल कपल म्हणून करण आणि काम्या यांची ओळख होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण करण आणि काम्या यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. त्यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला होता. आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत असतात.

नात्यात सतत होत असलेल्या भाडणांमुळे करण आणि काम्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे काम्या हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याने तीन दिवसांत लग्नाची घोषणा केली. अखेर करण याने २०१५ मध्ये अंकिता भार्गव हिच्यासोबत लग्न केलं.

करण याचं लग्न झालं, पण काम्या हिच्यासोबत असलेल्या त्याच्या नात्याच्या चर्चा आजही रंगत आहेत. रिपोर्टर्सनुसार, काम्या हिच्यासोबत करण अन्य तरुणीला डेट करत असल्याचं अभिनेत्रीला माहिती पडलं.. विभक्त झाल्यानंतर काम्या हिने करण याच्यावर अनेक आरोप लगावले.

मिळालेल्या माहितीनुसार; करण काम्या पंजाबीसोबत प्रत्युषा बॅनर्जीलाही डेट करत होता. काम्याने करण अनेकदा विचारलं. पण त्याने सत्य सांगितलं नाही. अखेर प्रत्युषा करण याच्यापासून दूर झाली. त्यानंतर प्रत्युषा अभिनेता राहुल सिंग रॉय याला डेट करु लागली. पण जेव्हा अभिनेत्री स्वतःचा जीव संपवला तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती.

करण आणि काम्या यांच्या नात्यात अनेक चढ – उतार आले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलं. काम्याने देखील लग्न केलं. पण अभिनेत्री पहिलं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. अभिनेत्री दुसरं २०२० मध्ये लग्न डॉक्टर शलभ डांग यांच्यासोबत केलं. आज अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आनंदी आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.