‘विक्रम वेधा’ प्रदर्शित होताच सैफ-करीनाने खरेदी केली महागडी कार; पहा Video

सैफ-करीनाच्या 'या' नव्या कारची किंमत वाचून डोळे विस्फारतील!

विक्रम वेधा प्रदर्शित होताच सैफ-करीनाने खरेदी केली महागडी कार; पहा Video
करीना कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2022 | 8:34 PM

करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानने (Saif Ali Khan) आपल्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या आणि आलिशान कारचा समावेश केला आहे. या दोघांनी नुकतीच मर्सिडीज बेंझ (Mercedes) कार खरेदी केली आहे. रविवारी या दोघांनी कारसमोर नारळ फोडून त्याची पूजा केली. त्यानंतर मुलगा जहांगीरला त्यांनी सर्वांत आधी या कारमध्ये फिरायला नेलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पापाराझी जेव्हा जेहचा व्हिडीओ शूट करत होते तेव्हा उत्साहात त्यानेसुद्धा हात दाखवला.

सैफ आणि करीनाने खरेदी केलेल्या या नव्या मर्सिडीज बेंझ S350D ची भारतातील किंमत ही जवळपास 1.90 कोटी रुपये इतकी आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी जीप रँगलर विकत घेतली होती. त्याची किंमत 60 लाखांहून अधिक होती.

सैफचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्याच्या दोन दिवसांनंतर लगेचच त्याने ही नवी कार विकत घेतली. ‘विक्रम वेधा’ हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये सैफसोबत हृतिक रोशनची मुख्य भूमिका आहे. मूळ तमिळ चित्रपटात आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पुष्कर आणि गायत्री यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

करीना लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात ती विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत काम करणार आहे. नेटफ्लिक्सवर तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचं नाव अद्याप जाहीर झालं नाही.