AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | सासूने दिलेल्या सल्ल्यामुळे करीना कपूर हिने घेतला मोठा निर्णय, त्यानंतर…

Kareena Kapoor | आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट मिळवण्यासाठी सासूने दिलेला सल्ला करीना कपूर हिच्यासाठी ठरला लाभदायक; बेबो म्हणाली..., सर्वत्र करीना कपूर हिची चर्चा...

Kareena Kapoor | सासूने दिलेल्या सल्ल्यामुळे करीना कपूर हिने घेतला मोठा निर्णय, त्यानंतर...
| Updated on: Sep 12, 2023 | 1:37 PM
Share

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. करीना हिच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी पदार्पण केलं. पण झगमगत्या विश्वात असलेली बेबोची जागा कोणीही घेवू शकलं नाही. करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयु्ष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. करीना कायम तिच्या कुटुंबाबद्दल चाहत्यांना अनेक गोष्टी सांगत असते. आता देखील अभिनेत्रीने चाहत्यांना एक मोठं सत्य सांगितलं आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीला सासूने एका सल्ला दिला होता. ‘तो’ सल्ला कोणता होता जाणून घेवू… ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान हिने स्वतः पेक्षा १० वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सैफ अली खान हा दोन मुलांचा वडील होता. सैफ याच्यासोबत लग्न केल्यामुळे अभिनेत्रीला अनेक गोष्टीचा सामना करावा लागला होता. आहे अभिनेत्री सैफ याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी समोर आलेल्या प्रसंगांबद्दल सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला प्रत्येकाने विचारलं लग्न का करत आहेस. लग्नानंतर तुझं करियर पूर्णपणे संपूण जाईल. तुला कोणी विचारणार नाही. पण मी पूर्णपणे सैफ अली खान याच्या प्रेमात होती. जर दिग्दर्शक, निर्माते यांना वाटत असेल लग्नानंतर माझं करियर संपेल तर, त्यामध्ये फक्त त्यांचं नुकसान होतं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नासाठी अनेकांचा नकार होता. पण माझ्या सासूबाईंनी माझा आत्मविश्वास कमी होवू दिला नाही. त्यांनी मला एक सल्ला दिला. अशा कोणत्याच गोष्टींवर लक्ष देवू नको. स्वतःला आव्हान दे आणि पूर्ण कर.. ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला… कारण लग्नानंतर मला फक्त करियरकडे नाही तर माझ्या घाराकडे देखील लक्ष द्यायचं होतं. ‘ सध्या सर्वत्र करीना कपूर हिची चर्चा रंगली आहे..

करीना हिच्या सासूबाईंबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. जेव्हा शर्मिला टागोल यांनी ‘दाग’ आणि ‘वक्त’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली तेव्हा शर्मिला यांचं लग्न झालं होतं. शिवाय त्यांनी सैफ अली खान याला देखील जन्म दिला होता.

करिना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर देखील करीना कपूर हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करीना लवकरच ‘जाने जान’ सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीचा ‘जाने जान’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना