
अभिनेत्री करीना कपूर आपल्या डाएटबाबत किती काळजी घेते हे सर्वांना माहित आहे. ती योग्य तो आहार घेते तसेच योगा, व्यायाम करते. तसेच ती तिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. करीनाची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर या देखील बऱ्याचदा तिच्या डाएटबाबत सांगत असतात तसेच हेल्थी टीप्सही देत असतात. अशाच एका गोष्टीबद्दल त्यांन सांगितलं आहे. ती गोष्ट म्हणजे चहा. एका व्यक्तीना दिवसातून किती कप चहा पिणे योग्य आहे? तसेच वेळ काय असावी हे देखील सांगितलं आहे.
सकाळी चहाने सुरुवात करावी का?
आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळ ही चहानेच होते. पण रुजुता यांच्या मते चहा न पिणे कधीही चांगले पण जर घ्यायचाच असेल तर तो सकाळी रिकाम्या पोटी घेऊ नये, त्यांच्यामते सकाळी चहाने सुरुवात करण्यापेक्षा कोणत्याही ताज्या फळाचा रस बनवून पिऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचन चांगले होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता.
शरीराला झोपेतून अचानक जागे करतात
त्यामुळे त्यांनी दिवसाची सुरुवात थेट चहा किंवा कॉफीने करण्यास नकार दिला आहे. यापूर्वीही तिने अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे की कॅफिन आणि सिगारेटसारखे उत्तेजक पदार्थ शरीराला झोपेतून अचानक बाहेर काढतात. यामुळे ब्लड प्रेशर, हार्ट रेट और ब्रीदिंग रेट वाढतं ज्यामुळे त्याचा शरीरावर ताण येतो.
Kareena Kapoor nutritionist
दुपारी 4 नंतर चहा न पिण्याचा सल्ला दिला
रुजुता यांच्या मते दिवसातून 2-3 कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नये. सामान्य व्यक्तीने यापेक्षा जास्त चहा पिणे योग्य मानले जात नाही. तसेच रुजुता यांनी दुपारी 4 नंतर चहा न पिण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला सकाळची सुरुवातसोबतच दुपारचा थकवा दूर करायचा असेल किंवा संध्याकाळी थोडं शांत रिलॅक्स वाटून घ्यायचं असेल तर आपल्या भारतीयांच्या मनात सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे चहा, पण रुजुता यांनी हाच दुपारचा चहा पिण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते दुपारचा चहा घेतल्याने झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो.
4. With sugar or sugarfree?
Sugar for sure. WHO and other global diabetes organizations say 6-9 tsp of sugar a day is ok. Add sugar to your chai/coffee, avoid the invisible sugar from packaged food (breakfast cereals, fruit juice, biscuits, etc).— Rujuta Diwekar (@RujutaDiwekar) April 4, 2018
चहा/कॉफीमध्ये साखर घालू शकता पण….
तसेच साखरेच्या प्रमाणाबद्दलही त्यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, ”डब्ल्यूएचओ आणि इतर जागतिक मधुमेह संघटना म्हणतात की दिवसाला 6 ते 7 चमचे साखर शरीरात जाणे ठीक आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्ही चहा/कॉफीमध्ये साखर घालू शकता पण ते प्रमाणात. तसेच पॅकेज केलेल्या अन्न, नाश्त्यातील काही पदार्थ, बिस्किटे इ. आधीच साखर असलेले पदार्थ टाळा,” असही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही चहा घेऊ शकता पण तो नक्कीच प्रमाणात.