Kareena Kapoor | करीना कपूरच्या घरात नॅनींसाठी ‘हा’ खास नियम; तुम्हीही कराल कौतुक!

करीना कपूरच्या घरात तैमूर आणि जेहच्या नॅनींसाठी एक खास नियम आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द करीनाने या नियमाविषयी खुलासा केला. तैमुरच्या बोलण्यावरून घरात हा खास नियम बनवला गेल्याचं तिने सांगितलं.

Kareena Kapoor | करीना कपूरच्या घरात नॅनींसाठी हा खास नियम; तुम्हीही कराल कौतुक!
Taimur with nanny
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2023 | 1:09 PM

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूरच्या दोन्ही मुलांसोबतच त्यांच्या नॅनीजसुद्धा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी त्यांच्या पगाराविषयीचे वृत्त व्हायरल होतात, तर कधी करीनाला या कारणासाठी ट्रोल केलं जातं की ती मुलांना नॅनीसोबतच अधिक वेळ सोडून देते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द करीनाने नॅनींविषयी एक खास गोष्ट सांगितली आहे. सैफ आणि करीनाच्या घरात नॅनींसाठी एक खास नियम आहे. विशेष म्हणजे तैमुर आणि जेह यांच्या बोलण्यावरूनच हा नियम बनवण्यात आला आहे. हा नियम ऐकल्यानंतर तैमुर आणि जेहचंही नॅनींवर किती प्रेम आहे, हे दिसून येतं.

तैमूरच्या प्रश्नानंतर बनवला खास नियम

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोषने केलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त करीनाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ‘एक्स्प्रेस अड्डा’ला दिलेल्या या मुलाखतीत करीना तिच्या खासगा आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. करीनाने यावेळी सांगितलं की तिच्या दोन्ही मुलांच्या नॅनी त्यांच्यासोबतच एकाच टेबलवर बसून जेवतात. सुरुवातीला नॅनी वेगळ्या टेबलवर जेवायच्या, तेव्हा तैमुरने आईवडिलांना प्रश्न विचारला की, ते वेगळे का जेवायला बसतात? त्यानंतर करीना आणि सैफ यांनी नॅनींसाठी हा खास नियम बनवला. म्हणूनच तैमुर आणि जेहसोबतच एकाच टेबलवर सर्वजण मिळून जेवतात.

“हा घरातील नियमच आहे. कारण नॅनी त्यांच्या स्वत:च्या मुलांप्रमाणेच माझ्या मुलांचा सांभाळ करतात. त्यांना तो आदर मिळालाच पाहिजे. ते माझ्या मुलांची खूप काळजी घेतात. मी जेव्हा काम करते, तेव्हा ते पूर्णवेळ त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे मला आणि सैफला मुलांकडून जितका आदर मिळतो, तो त्यांनाही मिळालाच पाहिजे. बहुतांश वेळी आम्ही एकत्रच असतो, एकत्र ट्रॅव्हल करतो. ते ज्याप्रकारे माझ्या मुलांची देखभाल करतात, ते पाहून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही”, असं करीना म्हणाली.