AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘करिश्मा का करिश्मा’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंडसोबत उरकलं लग्न

Karishma Ka Karishma Actress Jhanak Shukla: 'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री झनक शुक्ला हिने बॉयफ्रेंडसोबत उरकलं लग्न, तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा

'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंडसोबत उरकलं लग्न
| Updated on: Dec 14, 2024 | 11:42 AM
Share

Karishma Ka Karishma Actress Jhanak Shukla: ‘करिश्मा का करिश्मा’ फेम अभिनेत्री आणि ब्लॉगर झनक शुक्ला हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. झनक हिने बॉयफ्रेंड स्वप्निल सूर्यवंशी याच्यासोबत लग्न केलं आहे. 7 जानेवारी 2023 मध्ये रोका (साखरपुड्या पूर्वीची विधी) सोहळ्याचे फोटो पोस्ट करत नात्याची अधिकृत घोषणा केली. सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात ‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावत झनक हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री लाईमलाईटपासून सुंदर आयुष्य जगत आहे. पण आता झनक तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

क्यूटनेसमुळे झनक 90 च्या दशकातील मुलांमध्ये लोकप्रिय आहे. 90 च्या दशकात ‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेची लोकप्रियता चाहत्यांमध्ये अधिक होती. मालिकेनंतर झनक हिने ‘कल हो ना हो’ आणि हॉलिवूड ‘वन नाईट विद द किंग’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता झनक हिने आयुष्यातील नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अभिनेत्री बॉयफ्रेंड स्वप्निल सूर्यवंशी याच्यासोबत लग्न केलं आहे.

लग्नात झनक हिने लाल रंगाची साडी नेसली होती. नवरीच्या रुपात झनक सुंदर दिसत होती. तर झनकच्या पतीने शेरवानी घातली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

शिक्षणासाठी सोडला अभिनय

प्रसिद्धीझोतात असताना झनक हिने वयाच्या 15 व्या वर्षी लाईमलाईटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत अभिनेत्री यावर मोठं वक्तव्य देखील केलं होतं. ‘करिश्मा का करिश्मा मालिकेला यश मिळाल्या नंतर ‘कल हो ना हो’ आणि ‘वन नाइट विद द किंग’ सिनेमांमध्ये देखील काम केलं. पण अभिनेत्री शिक्षणाला अधिक महत्त्व देत अभिनयाचा निरोर घेतला…

झनक आता रुपेरी पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर झनक हिला 66.5K नेटकरी फॉलो करतात, तर झनक फक्त 644 जणांना फॉलो करते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!