करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीचा वाद पेटला, 30 हजार कोटींच्या संपत्तीवर हक्क सांगणारी तिसरी महिला कोण?

Sunjay Kapur Property Dispute: करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवर वाद सुरु, संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नीनंतर संपत्तीवर हक्क सांगणारी 'ती' महिला कोण?

करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीचा वाद पेटला, 30 हजार कोटींच्या संपत्तीवर हक्क सांगणारी तिसरी महिला कोण?
फाईल फोटो
| Updated on: Aug 18, 2025 | 9:09 AM

Sunjay Kapur Property Dispute: अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबियांमध्ये संपत्तीवरून वाद सुरु आहे. संजय कपूरची आई राणी कपूर यांच्या पत्रानंतर हा वाद निर्माण झाला. आता आईच्या बाजूने उभी राहत संजय याच्या बहिणीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय कपूर यांची बहीण मंधिरा कपूर म्हणाली, ‘याबद्दल मी सोशल मीडियावर ऐकलं आहे. मला नाही माहिती, प्रिया सचदेवा कपूर आता प्रिया संजय कपूर का झाली आहे? खरं सांगायचं झालं तर हा माझ्यासाठी चिंतेचा विषय नाही, कारण मला असं वाटतं आहे तिथे खूप काही घडत आहे आणि मला सर्वांचं उत्तर हवं आहे. नाव बदलण्यापेक्षाही जास्त माझ्या आईची एक साधी विनंती होती. आम्ही कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे… 13 दिवसांत या कुटुंबाकडून सर्वकाही हिरावून घेतलं आहे.”

पुढे मंधिरा कपूर म्हणाली, ‘आमच्याकडून कोणती कायदेशीर कारवाई नव्हती. फक्त एक पत्र होतं ज्यामध्ये लिहिलेलं की, सर्वकाही समजण्यासाठी थोडा वेळ द्या? सोना कॉमस्टारपासून कायदेशीर कारवाई सुरु झाली. जी व्हायला नको होती, कारण आम्ही सोना कॉमस्टारवर कोणत्याही प्रकारचा आरोप केलेला नाही. मी पुन्हा एकदा सांगेन की, सोना आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. आम्ही सर्वांनी सोना कंपनीसाठी काम केलं आहे. तर आता आम्हाला सांगितलं जात आहे, जी कंपनी आमच्या कुटुंबाने उभी केली आहे, ती आता आमच्या हातून गेली आहे. मला असं वाटतं की, आम्ही फक्त आमच्या भावाला नाही तर, सर्वकाही गमावलं आहे.?’

रिपोर्टनुसार, संजय कपूर 30 हजार कोची रुपयांच्या मोबिलिटी टेक कंपनीचा प्रमुख होता. 12 जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना त्याचं निधन झालं. जेव्हा सोना कॉमस्टारने संजयची आई राणी कपूर यांना काम थांबवण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांना सून प्रिया सचदेव कपूर यांना कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं गेलं.

मंधिरा म्हणाली, ‘हा वारसा माझ्या वडिलांनी निर्माण केला होता आणि आज आम्हाला सांगितलं जात आहे की या वारशावर आमचा कोणताही अधिकार नाही.’ संजय कपूर यांच्या निधनानंतर संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे.