AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचवीत सोडली शाळा, लग्नानंतर अभिनयाला रामराम; तरीही कोट्यवधींची माया कमावते ही प्रसिद्ध अभिनेत्री

Karisma Kapoor : 5 वी पास होताच अभिनेत्रीने शाळा सोडली आणि अभिनयाकडे वळली... अभिनेत्रीने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले. पण लग्नानंतर अभिनेत्री अभिनयाला देखील निरोप दिला, तरीही कोट्यवधींची माया कमावते 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री.. तिच्याबद्दल जाणून व्हाल हैराण...

पाचवीत सोडली शाळा, लग्नानंतर अभिनयाला रामराम; तरीही कोट्यवधींची माया कमावते ही प्रसिद्ध अभिनेत्री
अभिनेत्री करिश्मा कपूर
| Updated on: May 08, 2026 | 10:35 AM
Share

Karisma Kapoor : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री तर अशी आहे, जिने पाचवी पास होताच शाळा सोडली आणि अभिनय करण्यास सुरुवात केली.. आज ती अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. 90 च्या दशकात करिश्मा बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल होती. उत्तम करियरच्या जोरावर करिश्मा हिने गडगंज संपत्ती जमा केली आहे. आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, करिश्मा मोठी कमाई करते.

करिश्मा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा जन्म 25 जून 1974 रोजी झाला. करिश्मा हिने सुरुवातीचं शिक्षण कॅथेड्रल एन्ड जॉन कॉनन स्कूल येथून केलं. पण अभिनयात करियर करण्यासाठी तिने फार कमी वयात शाळा सोडली. रिपोर्टनुसार पाचवी पास झाल्यानंतर करिश्मा हिने शाळा सोडली. करिश्मा हिचं शिक्षण फक्त 5 वी पास आहे.

करिश्माने करियरची सुरुवात 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ सिनेमातून केली. त्यानंतर करिश्मा हिने मागे वळून कधीच पाहिलं नाही. ‘जिगर’, ‘अनाडी’, ‘राजा बाबू’, ‘अंदाज़ अपना अपना’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत करिश्माने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. तरी देखील कोट्यवधींची मालकीण आहे.

किती कोटींची मालकीण आहे करिश्मा कपूर

रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिची नेटवर्थ जवळपास 120 कोटी आहे. तिला महागड्या गाड्यांचा देखील प्रचंड शोक आहे… तिच्याकडे 1.80 कोटी किमतीची मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि 2.82 कोटी किमतीची लेक्सस एलएक्स 470 यांसारख्या गाड्या आहेत. तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ ई-क्लास, बीएमडब्ल्यू 7 सिरीज आणि ऑडी क्यू7 देखील आहेत.

एवढंच नाही तर, करिश्मा हिने मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात एक घर भाड्याने दिलं आहे, ज्यासाठी तिला दरमहा 5.51 लाख रुपये भाडं मिळतं. याशिवाय, ती आणि तिची आई बबिता यांनी वांद्रे पश्चिममधील एक शोरूमची जागा एका ज्वेलरी ब्रँडला दरमहा 6 लाख रुपये भाड्याने दिली आहे. ब्रांड एंडोर्समेंटमधून देखील अभिनेत्री मोठी कमाई करते.

करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलेलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर करिश्मा हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. दोन मुलांचा सांभाळ करिश्मा हिने सिंगल मदर म्हणून केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ