
Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण करिश्मा आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील करिश्मा तिच्या फ्लॅटमुळे चर्चेत आली आहे. वांद्रे येखील प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्मा कपूर हिचा एक – एक फ्लॅट आहे… असा दावा अभिनेता अक्षय कुमार यांने एका शोमध्ये केला. सांगायचं झालं तर, अक्षय सध्या ‘सो व्हील ऑफ फॉर्चून’ शोच्या होस्टची भूमिका पार पाडत आहे. तर अभिनेत्याच्या शोमध्ये करिश्मा पाहुणी म्हणून उपस्थित राहलेली. यावेळीच अक्षय याने करिश्मा हिच्या वांद्रे येथील फ्लॅटबद्दल मोठं वक्तव्य केलं.
शो दरम्यान, अक्षय कुमार याने करिश्माचं कौतुक केलं. अभिनेता म्हणाला, ‘सर्वांना माहिती आहे की, करिश्मा माझी पहिली हिरोईन आहे. करिश्मासोबत मी पहिला सिनेमा केला… पहिलं गाणं केलं… मला करिश्माला म्हणायचं आहे की, तू प्रचंड सुंदर दिसतेस…’ यावर करिश्मा हिने अक्षय याचे आभार देखील मानले.
त्यानंतर विनोदी अंदाजात अक्षय म्हणाला, ‘वांद्रे येथील प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्माचा एक – एक फ्लॅट आहे. बिल्डिंग खाली बोर्ड असतो. त्यावर ती कधीच पूर्ण नाव लिहित नाही. के. कपूर असं लिहिते. शिवाय आईच्या नावावर देखील फ्लॅट आहे. बी. कपूर या नावाने देखील फ्लॅट आहेत… आता ते खार आणि सांताक्रुझ येथे देखील स्वतःची संपत्ती उभी करणार आहे. पण एक गोष्ट चांगली आहे. ते फक्त एकच फ्लॅट घेतात. दुसरे लोकांसाठी बाकी ठेवतात….’ अक्षय याच्या वक्तव्यानंतर प्रेक्षक देखील पोट धरुन हसू लागले.
1992 मध्ये प्रदर्शित अक्षय कुमार याचा पहिला सिनेमा झालेला. सिनेमाची निर्मिता प्रमोद चक्रवर्ती यांनी केली होती. सिनेमात अक्षय आणि करिश्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात अक्षय याने आनंद के मल्होत्रा तर, करिश्मा हिने सपना सक्सेना या भूमिकेला न्याय दिलेला. सिनेमात अक्षय आणि करिश्मा यांच्यासोबत अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, तनुजा, दन धनोओ, राजीव वर्मा, विजू खोटे यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.