कार्तिक आर्यनने केले बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दलचे मोठे गुपित उघड, म्हणाला, इथे दर शुक्रवारी बदलतात..

Kartik Aaryan : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. कार्तिक आर्यनचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

कार्तिक आर्यनने केले बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दलचे मोठे गुपित उघड, म्हणाला, इथे दर शुक्रवारी बदलतात..
Kartik Aaryan
| Updated on: Jun 08, 2024 | 4:42 PM

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. ज्यावेळी बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट फ्लॉप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यनचे चित्रपट धमाका करताना दिसले. कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कार्तिक आर्यन दिसत आहे. आता नुकताच एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. कार्तिक आर्यन याच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे.

कार्तिक आर्यन याला विचारण्यात आले की, इंडस्ट्रीमध्ये तुझे कोणी मित्र आहेत का? यावर कार्तिक आर्यनने मोठा खुलासा करत म्हटले की, माझे कोणीही मित्र इंडस्ट्रीमध्ये नाहीत. मी इथे काम करण्यास येतो. माझे जास्त करून बाहेरचे आणि कॉलेजचे मित्र आहेत. बाॅलिवूडबद्दल बोलायचे झाले तर मी फक्त त्यांच्यासोबत काम करतो.

मुळात म्हणजे मी इथे मैत्री करण्यासाठी आलोच नाही, हे माझे काम आहे. मी जेंव्हा काम करतो, त्यावेळी मी मस्ती करतो. परंतू मी हे कधीच बोलू शकत नाही की, इथे माझे कोणी मित्र आहेत. मी इथे सर्वांना ओळखतो परंतू येथे शुक्रवारीपासून ते शुक्रवारपर्यंतचे बदलणारे खूप नाते बघितले आहेत, जे मला आवडले नाही.

मी स्वत: निर्णय घेतला की, माझी लाईफ मी बाहेर ठेवेल. मी कोणावर आरोपही करू नाही शकत. तुम्ही बारा बारा तास एकसोबत काम करतात. ते नॉर्मल आयुष्यात देखील होते. आज तुमचे ऑफिस इथे आहे तर पुढच्या वर्षी दुसरीकडे. तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात नाही राहू शकत. त्याचप्रमाणे ते इथेही लागू होते. ऑफिस सोडल्यानंतर तुम्ही प्रत्येकाच्या संपर्कात नाही राहू शकत.

थोडक्यात काय तर कार्तिक आर्यन याने स्पष्टपणे सांगितले की, त्याचे  मित्र बॉलिवूडमध्ये नाहीत. त्याला फक्त इथे काम करायचे आहे, कोणतीही मैत्री वगैरे करण्यासाठी तो इथे आला नाहीये. कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. कार्तिक आर्यनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कार्तिक आर्यन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.