AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 40व्या वर्षी कश्मीरा होणार आई; खास अंदाजात दिली गुड न्यूज

प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा ईरानीने 40 व्या वर्षी आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी तिने ही आनंदाची बातमी दिली आहे, ज्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

वयाच्या 40व्या वर्षी कश्मीरा होणार आई; खास अंदाजात दिली गुड न्यूज
kashmira Irani shared good news
| Updated on: Aug 31, 2026 | 7:35 PM
Share

टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात नाव कमावलेली, प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा ईरानीने (Kashmira Irani) गुड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत आयुष्यातली सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठा आनंद शेअर केला आहे. ती लवकरच आई होणार आहे. तिने ही बातमी सांगताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आलं असून अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिने अतिशय सुंदर अंदाजात ही खास खबर सर्वांना सांगितली.

कश्मीराने दोन शहाळ्यांचा फोटो शेअर केला. त्या दोन्हींवरही कॅप होती आणि एका शहाळ्यावर आई तर दुसऱ्या शहाळ्यावर बाबा असं लिहीलं होतं. करंट स्टेटस अशी कॅप्शन तिने या फोटोंसोबत लिहीली आणि कमिंग सून असा हॅशटॅहगही तिने त्यासोबत जोडला होता.

सेलिब्रिटींकडून अभिनंदन

कश्मीराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्यूज शेअरल केली आणि तिचे मित्र-मैत्रीणी तसेच सहकलाकारांनी तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. खूप खूप अभिनंदन , देवाचा आशर्विदा नेहमी तुझ्यासोबत राहो आणि तू खूप आनंदी व्हावीस, अशा शुभेच्छा गौहर खानेने दिल्या. तर रिद्धीमा पंडितने चक्क हार्ट इमोजी कमेंट केली. कश्मीराच्या चाहत्यांनीही तिला आणि तिच्या पतीला खूप शुभेच्छा देत अभिनंदन केलं.

कश्मीरा आणि अक्षत सक्सेना

टीव्ही अभिनेत्री कश्मीरा आणि अक्षत सक्सेना या दोघांनी 2024 साली लग्न केलं. विवाहानंतर 2 वर्षंनी या कपलने गुड न्यज दिली. या नव्या प्रवासाबद्दल दोघेही खूप खुश आहेत. अक्षत हा पायलट आहे, पण त्यानेही अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलंय. नुकताच तो ऑफरेशन सफेद सागरमध्ये दिसला होता.

कश्मीराबद्दल सांगायचं झालं तर अभिनयात करिअर करण्यासाठी ती अवघ्या 17 व्या वर्षी मुंबईत आली. तिने गूगल, टाटा स्काय, नेरोलॅक सारख्या अनेक जाहिराती केल्या. मात्र ‘अंबर धरा’ या टीव्हीवरील गाजलेल्या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. 2017 साली ती रंगून चित्रपटात दिसली, तसेच सलमान खानच्या टायगर जिंदा है मध्येही तिची भूमिका होती. नुकतीच ती इम्तियाज अली च्या मैं वापस आउंगा या चित्रपटातही झळकली.

Follow Us
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या मृत PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या मृत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची...
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची राजकारणात चर्चा!
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न..
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न हटवण्याची भूमिका
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला अन्... काळजाला भिडणारा Video समोर
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत