रक्ताळलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल; बॉलिवूड अभिनेत्रीचा भिषण अपघात, सेलिब्रिटींकडून चिंता व्यक्त
बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये भीषण अपघात झाला. तिने रक्ताळलेले कपडे म्हणजे अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे.

बॉलिवू़ड अभिनेत्री आणि कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाहचा भिषण अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. कश्मीराचा लॉस एंजिल्समध्ये अपघात झाला असून तिने अपघाताचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पासून सर्व सेलिब्रिटींकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
कश्मीरा शाह ही सध्या लॉस एन्जिल्समध्ये आहे. तर तिचे दोन्ही मुलं रेयान आणि कृषांग हे कृष्णा अभिषेकसोबत मुंबईला परतले. त्यानंतर त्या दोघांनी अनेक रील्सही शेअर केले होते. पण आता कश्मीरानं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
कश्मीराने फोटो शेअर करत कश्मीराने स्वत:च तिच्या अपघाताची बातमी दिली आहे. रक्तानं माखलेल्या कपड्याचा फोटो शेअर केल्याने सर्वांना तिची काळजी आणि चिंता वाटू लागली आहे. अनेक सेलिब्रिटींकडून तिची विचारपूस करण्यात आली तसेच तिला काळजी घेण्याबाबतही सांगण्यात आले.
- Kashmira Shahs terrible accident
दरम्यान कश्मीराने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ‘देवा, मला वाचवण्यासाठी तुझे आभार. खूप भयानक घटना घडली. काही मोठं होणार होतं, पण नशिबानं थोडक्यात झालं. आशा आहे की दुखापतीचे निशाण राहणार नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येतेय” असं मत व्यक्त करत तिने कृष्णा अभिषेकसोबत दोन्ही मुलांची नावं देखील लिहिली आहेत.
- Kashmira Shahs terrible accident
कश्मीराच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसेच राजेश खट्टरनं विचारलं की ‘कॅश काय झालं तुला? आशा आहे की सगळं काही चांगलं आहे, ‘कृष्णा अभिषेकनं कमेंट केली की ‘देवाच्या कृपेनं तू आता ठीक आहेस’ तर, किश्वर मर्चेंट म्हणाली “देवा, ‘तू ठीक आहेस ना?” दीपिशिखा नागपालनं लिहिलं आहे की, ‘हे काय झालं??? तू लवकर परत ये.’ तर पूजा भट्टनं सुद्धा कश्मीराविषयी चिंता व्यक्त केली आहे “देवा, ‘कैश नेमकं काय झालं. आशा करते की ती लवकर ठीक होशील’, अशी कमेंट तिने केली आहे.
दरम्यान रक्ताने माखलेल्या कपड्यांव्यतिरिक्त आणि अपघात झाल्याच्या माहितीशिवाय कश्मीराकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. सध्या ती सुखरूप असून उपचार घेत असल्याचे समोर आलं आहे.
