
Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी नुकताच त्यांच्या पहिल्या बाळाचं जगात स्वागत केलं आहे. शुक्रवारी कतरिना हिने गोंडसा मुलाला जन्म दिला. विकी आणि कतरिना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी 8.23 वाजता कतरिनाने मुलाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयाने ऑफिशियल हेल्थ अपडेट जारी केलं.
रुग्णालयाने जारी केलेल्या अपडेटमध्ये असं सांगण्यात आलं आहे के, ‘अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या घरातन मुलाचं आगमन झालं आहे… आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे. पण अद्याप डिस्चार्जची तारीख ठरवण्यात आलेली नाही…’
मुलाला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना काळजी सतावत होती… अखेर कतरिना आणि तिच्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून चाहत्यांना मिळालेली नाही.. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. याआधी कतरिना आणि विकी कौशल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं.
पोस्ट करत दोघे म्हणाले, ‘आमच्या घरी आनंदाचं गाठोडं आलं आहे. प्रेम आणि कृतज्ञतेने आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतो – कतरिना आणि विकी.. ‘ सध्या विकी आणि कतरिना यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला… 2020 मध्ये दोघांनी एकमेकांस डेट करण्यास सुरुवात केली. दोघांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं.. पण हळू – हळू त्यांच्या नात्याचं सत्य समोर येऊ लागलं…
जवळपास 1 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये राजस्थान येथे दोघांनी शाही अंदाजात लग्न केलं. त्यांचं लग्न पूर्णपणे खाजगी ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांच्या आयुष्या नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना – विकी आणि त्यांच्या मुलाची चर्चा सुरु आहे.