Katrina Kaif | बेबी प्लॅनिंगच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर कतरिना कैफचं स्पष्टीकरण; म्हणाली..

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती.

Katrina Kaif | बेबी प्लॅनिंगच्या 'त्या' वक्तव्यावर अखेर कतरिना कैफचं स्पष्टीकरण; म्हणाली..
Vicky and KatrinaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 4:52 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीच्या जोरदार चर्चा आहेत. कतरिनाने जेव्हा सलमान खानची बहीण अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईद पार्टीला हजेरी लावली, तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर खुद्द कतरिना तिच्या मित्रमैत्रिणींसमोर बेबी प्लॅनिंगबद्दल व्यक्त झाल्याचं म्हटलं गेलं. हातात असलेले दोन-तीन प्रोजेक्ट्स पूर्ण केल्यानंतर ती आणि विकी कौशल बेबी प्लॅनिंग करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या सर्व चर्चांवर कतरिनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रेग्नन्सीची चर्चा कुठून सुरू झाली?

अर्पिता खानच्या ईद पार्टीतील कतरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यापैकी बरेचसे कमेंट्स हे तिच्या प्रेग्नंसीबद्दल होते. ‘मला असं वाटतंय की ती गरोदर आहे’, अशी कमेंट एकाने लिहिली होती. तर ‘तिने बऱ्याच काळानंतर मीडियासमोर हजेरी लावली’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं. त्यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘कारण ती प्रेग्नंट आहे.’ कतरिनाच्या या व्हिडीओवर एका युजरने म्हटलं होतं, ‘ती खरंच प्रेग्नंट आहे का? कारण ती सध्या जिमला जातानाही दिसत नाही. कतरिना थोडी गुबगुबीतही दिसतेय आणि सध्या ती शूटिंगसुद्धा करत नाहीये.’

हे सुद्धा वाचा

बेबी प्लॅनिंगविषयीच्या चर्चा

पुढील एक – दोन चित्रपटांच्या शूटिंगनंतर बाळाचं प्लॅनिंग करणार असल्याचं कतरिनाने तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितल्याची चर्चा सुरू झाली होती. कतरिना सध्या फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचसोबतच ती साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबतही ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात झळकणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्यानंतर विकी आणि कतरिना बेबी प्लॅनिंग करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाने प्रेग्नन्सी आणि बेबी प्लॅनिंगविषयी कोणतंच वक्तव्य केलं नव्हतं, असं तिच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या किंवा बेबी प्लॅनिंगच्या सर्व चर्चा खोट्या आहेत, असंही ते म्हणाले.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती. आता सोशल मीडियावर विकी-कतरिना एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.