Katrina Kaif : कतरिना कैफच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंग; टीव्ही अभिनेत्रीने फटकारलं

कतरिना कैफचा एक व्हिडीओ शेअर करून अनेक सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत होते. काहींनी तिला ट्रोलही केलं. मात्र आता टीव्ही अभिनेत्रीने समोर येत कतरिनाला सपोर्ट करत ट्रोलर्सना चोख सुनावलं आहे.

Katrina Kaif : कतरिना कैफच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंग; टीव्ही अभिनेत्रीने फटकारलं
Katrina Kaif
| Updated on: Sep 01, 2026 | 2:24 PM

अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif )गेल्या वर्षी मुलगा विहानला जन्म दिला. प्रेग्नन्सीनंतर सार्वजनिक जीवनात ती फारशी दिसलेली नाही. कोणतंही मोठं फंक्शन किंवा कार्यक्रमात तिने हजेरीदेखील लावलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी कतरिना बाहेर दिसली. दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या निधनानंतर प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कतरिना ही तिचा पती, अभिनेता विकी कौशल तसेच सासरे यांच्यासोबत हजर होती. कोहली यांना श्रद्धांजवी वाहत तिने कुटुंबियांचं सांत्वन केलं. मात्र त्यावेळचा तिचा अपीअरन्स, तिचा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तिच्या वाढलेल्या वजनावरून बरंच काही सुनावण्यात आलं. कतरिनाने यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र तिचं हे ट्रोलिंग टीव्ही अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय हिला बिलकूल रुचलं नसून तिने कतरिनाला पाठिंबा दर्शवला आहे.

एवढंच नव्हे तर शिवालिका हिने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देत अशी मानसिकता किती कुचकामी आहे, असंही सुनावलं. शिवालिका ओबेरॉयने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कतरिना कैफचा तो फोटो पोस्ट केला, ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत होतं. ‘काय झालंय म्हणजे ?, हे मातृत्व आहे !’ असं म्हणत तिने टीकाकारांना सुनावलं.

काय म्हणाली शिवालिका ?

तिने पुढे लिहिलं, ‘नॉर्मल पोस्टपार्टम रिकव्हरी अशीच दिसते—कधी चांगली, कधी वाईट, सूज, थकवा आणि या सगळ्यांच्या मधल्या प्रत्येक गोष्टीसह (असते). मातृत्वाचं असं रूप गौरवणं बंद करा, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. गेल्या काही दिवसांत अशा अनेक पोस्ट पाहिल्यानंतर मला वाटतंय की ही मानसिकता किती हास्यास्पद आहे’ अशा शब्दांत तिने सुनावलं.

शिवालिका नुकतीच झाली आई

शिवालिका ओबेरॉय नुकतीच आई झाली. काही दिवसांपूर्वीच तिने बाळाचं स्वागत केलं. त्यामुळे गर्भधारणेनंतर शरीरात होणारे बदल ती स्वतःच्या अनुभवातून चांगल्या प्रकारे समजू शकते. एखाद्या अभिनेत्रीला गर्भधारणेनंतर तिच्या बदललेल्या रूपावरून ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पत्रलेखासह अनेक अभिनेत्रींनाही अशाच प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता त्यात कतरिनाच्या नावाचीही बर पडली. अनेकांनी तिला वाढलेल्या वजनावरून ट्रोल केलं.

गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिना आणि विकी कौशल यांना मुलगा झाला. त्यांनी त्याचं नाव विहान असं ठेवलं. मात्र मुलाच्या जन्मानंतर कतरिना फारशी बाहेर दिसली नाही, लाईमलाइटपासून ती दूर होती. गेल्या आठवड्यात ती मुंबईत
दिसली. कुकू कोहली यांच्या प्रार्थना सभेत ती आली होती. मात्र कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून आणि प्रसूतीनंतर झालेल्या शारीरिक बदलांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर काही ट्रोलर्सनी तिच्या बदललेल्या रूपावर आणि वजनावरून असंवेदनशील तसेच आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. मात्र, कतरिनाच्या अनेक चाहत्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत तिची बाजू घेतली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us