KBC 17: तुम्हाला ‘महाभारता’ विषयी माहितीये? मग 12.50 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर सांगा, 49% प्रेक्षकांनी दिले बरोबर उत्तर

KBC 17: कौन बनेगा करोडपती 17 मध्ये स्पर्धकाने 25 लाख रुपये जिंकले. पण या शोमध्ये 'महाभारत'शी संबंधित एक रंजक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले होते. तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकाल का?

KBC 17: तुम्हाला महाभारता विषयी माहितीये? मग 12.50 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर सांगा, 49% प्रेक्षकांनी दिले बरोबर उत्तर
KBC 17
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 17, 2025 | 10:25 AM

छोट्या पडद्यावरील क्वीज शो म्हणून कौन बनेगा करोडपती पाहिला जातो. या शोचा 17वा सिझन 16 ऑक्टोबर म्हणजे कालच सुरु झाला आहे. तसेच शोची सुरुवात उत्कृष्ट स्पर्धकासह झाली. या स्पर्धकाने बुद्धीमत्तेच्या जोरावर अमिताभ बच्चन यांनाही प्रभावित केले. हा स्पर्धक खेळाबरोबरच अभ्यासातही खूप हुशार असल्याचे दिसत आहे. या स्पर्धकाने 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि 25 लाख रुपये रक्कम जिंकली. दरम्यान, रामायणाशी संबंधीत विचारलेल्या प्रश्नाने त्यांचे लक्ष वेधले. हा प्रश्न काय होता? चला जाणून घेऊया…

12.50 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने दोन लाइफलाइन्सचा वापर केला. स्पर्धकाने पहिली लाइफलाइन ‘ज्ञान अस्त्र’ वापरून प्रश्न बदलला, पण पर्यायी प्रश्नावरही त्या अडकल्या. त्यांनी नंतर ऑडियन्स पोलचा वापर केला. आता हा 12 लाख 50 हजार रुपयांसाठीचा प्रश्न काय होता? चला जाणून घेऊया..

वाचा: पत्नीला गॅसचा त्रास, डॉक्टर नवऱ्याचा भयानक कट! असं इंजेक्शन दिलं की… गुपित उघडताच सगळेच थरथरले

प्रश्न- महाभारतानुसार, राजा विराट यांच्या पत्नीचे नाव काय होते, ज्यांची अज्ञातवासात द्रौपदीशी मैत्री झाली होती?

पर्याय-

A. भारती

B. सुदेशना

C. रोहिणी

D. उलूपी

प्रेक्षकांनी 49 टक्के मते पर्याय बी. सुदेशना यांना दिली. स्पर्धकाने प्रेक्षकांचा सल्ला मानला आणि पर्याय बी. सुदेशना निवडला, जो अगदी बरोबर उत्तर आहे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती होते का?

अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला 25 लाखांचा 13वा प्रश्न विचारला. प्रश्न आहे- कोणत्या भारतीय सामाजिक शास्त्रज्ञाचा जन्म 1905 मध्ये म्यानमारमध्ये झाला आणि त्यांचे नाव तिथल्या प्रमुख नदीच्या नावावर ठेवण्यात आले होते?

पर्याय-

A. मधुमाला चट्टोपाध्याय

B. कमला सोहनी

C. इरावती कर्वे

D. टी वी पद्मा

स्पर्धकाने ‘आस्क दी एक्सपर्ट’ लाइफलाइन वापरून पर्याय सी. इरावती कर्वे निवडला, जो बरोबर आहे.

बिग बींनी त्यांना 50 लाखांच्या प्रश्नावर चार झेंड्यांचे चित्र दाखवले. ते दाखवून प्रश्न विचारला की, ‘यापैकी कोणता झेंडा सूर्याचा संदर्भ देत नाही?’ पण प्रश्नाचे योग्य ते उत्तर माहिती नसल्यामुळे आणि सर्व लाइफलाइन संपल्यामुळे स्पर्धकाने गेम सोडला. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे- पर्याय डी, जो पलाऊ देशाचा झेंडा आहे, ज्यामध्ये निळा रंग समुद्र दर्शवतो आणि पिवळ्या रंगाची डिस्क चंद्र दर्शवते.