AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Mategaonkar : ‘आंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा…’, पैशांचं महत्त्व सांगत केतकीचं कमाईवर मोठं वक्तव्य

Ketaki Mategaonkar : अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने नुकताच कमाईबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 'आंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा, आंथरूण मोठं केलं तर...', असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केतकी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Ketaki Mategaonkar : 'आंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा...', पैशांचं महत्त्व सांगत केतकीचं कमाईवर मोठं वक्तव्य
Ketaki Mategaonkar
| Updated on: Sep 11, 2026 | 9:10 AM
Share

Ketaki Mategaonkar : अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. केतकीच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता केतकी कोणत्या सिनेमामुळे किंवा गाण्यामुळे चर्चेत आलेली नाही तर, आयुष्यातील पैशांच्या महत्त्वावर स्पष्टपणे बोलली आहे. आर्थिक बाबतीत तिने स्वतःची मानसिकता आणि दृष्टीकोन काय आहे? याबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र केतकी हिची चर्चा रंगली आहे.

आयुष्यातील पैशांच्या महत्त्वावर केतकी म्हणाली, ‘वक्तव्य थोडं बोल्ड वाटेल पण मला आंथरून पाहून पाय पसरावे…’ हे वाक्य आवडतन नाही, त्यापेक्षा, ‘आंथरुन मोठं केलं तर… आंथरुन मोठं करण्याचा प्रयत्न केला तर…’, असं केतकी हिने एका मुलाखतीत सांगितलं. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पैशांकडे केवळ गरज म्हणून न पाहता, तो आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. हे पाहिल पाहिजेच. पैसा अर्थातच सर्वकाही नाही. पण तो सर्वकाही आहे सुद्धा…’

‘आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग पैसा खूप चांगल्या पद्धतीने असेल तर, तो मॅनेज करतो…’, यावेळी केतकी हिने दैनंदिन आयुष्यातील एक उदाहरण देत मुद्दा पटवून दिला. ‘महिन्याला एकदा दुकानात जाऊन किराणा आणण्याऐवजी अनेकदा आपण ब्लिकिंट यांसारख्या सुविधांचा वापर करतो. ज्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आजच्या जीवनशैलीत पैसा किती महत्त्वाचा आहे. हे लक्षात येतं… सगळ्या गोष्टींचा विचार करता पैसा किती महत्त्वाचा आहे, हे कळून येतं.’ असं देखील केतकी म्हणाली.

केतकी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज तिला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. ‘शाळा’ सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर टाईमपास’, ‘काकस्पर्श’, ‘फंतरू’ यांसारख्या सिनेमात केतकीने महत्त्वाची भूमिका साकरली.  सिनेमात अभिनेत्रीने साकरलेल्या भूमिकांना चाहत्यांनी डोक्यावर  घेतलं.

केतकी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...