Ketki chitale: केतकीला 21 प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा; जबरदस्ती कारवाई न करण्याचे कोर्टाचे पोलिसांना निर्देश

| Updated on: Jun 27, 2022 | 3:31 PM

उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात तिच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. केतकीला 22व्या एफआयआरमध्ये नुकताच जामीन मंजूर झाला.

Ketki chitale: केतकीला 21 प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा; जबरदस्ती कारवाई न करण्याचे कोर्टाचे पोलिसांना निर्देश
Ketki chitale
Image Credit source: Twitter
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) मोठा दिलासा मिळाला आहे. आज (सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने केतकीला 21 प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा (interim relief) दिला आहे. उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात तिच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. केतकीला 22व्या एफआयआरमध्ये नुकताच जामीन मंजूर झाला. केतकीविरोधातील 21 पेक्षा अधिक प्रलंबित एफआयआरमध्ये अटक करणार नसल्याचं निवेदन महाराष्ट्र पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलं होतं. न्यायालयाने हे निवेदन स्वीकारलं आहे.

फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीविरोधात विविध ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यात केतकीला मोठा दिलासा मिळाला आहे. तिच्याविरोधात 21 प्रलंबित एफआयआरमध्ये हायकोर्टाने तिला अंतरिम दिलासा दिला आहे. 23 जून रोजी केतकीची ठाणे कारागृहातून सुटका झाली. अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी केतकी आणि तिच्या वकिलांनी दिली होती. शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. या गुन्ह्यात तिला ठाणे न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. नवी मुंबई इथं दाखल ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ट्विट-

अभिनेत्री केतकी चितळेने 14 मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ॲड नितीन भावे यांची पोस्ट केतकीने शेअर केली होती. शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्या आजाराचा संदर्भ घेऊन अपमानकारक ही पोस्ट होती. या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर केतकीला अटक झाली.