AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 कोटींच्या पार जाणारच..; नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर; हिरोने ताणली उत्सुकता

Khashaba Teaser: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. 

100 कोटींच्या पार जाणारच..; नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा जबरदस्त टीझर; हिरोने ताणली उत्सुकता
Khashaba teaserImage Credit source: Youtube
| Updated on: Jul 02, 2026 | 1:03 PM
Share

‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारखे सलग यशस्वी चित्रपट देत, भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती केली आहे. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘खाशाबा’निमित्त पुन्हा एकदा एका भव्य आणि प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या ‘खाशाबा’च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मसवर रिलीज करण्यात आला आहे. पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, दमदार दृश्यरचना, उत्कंठावर्धक वातावरण, संघर्षाची भावनिक तीव्रता आणि चित्रपटाचा सिनेमॅटिक आवाका या टीझरमधून प्रभावीपणे अनुभवायला मिळतो.

नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट महाराष्ट्रातील संघर्षशील कुस्तीपटूची कहाणी सांगतो. ‘खाशाबा’ हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं आणि भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा इतिहास घडवला. भारतीय क्रीडाक्षेत्रातील हा अभिमानास्पद प्रवास मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात साकारत हा चित्रपट प्रादेशिक सिनेमातील सर्वात मोठ्या क्रीडापटांपैकी एक ठरण्याची क्षमता बाळगून आहे.

पहा ‘खाशाबा’चा टीझर-

संगीत क्षेत्रातील दिग्गज जोडी अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी ऑडिशनच्या कठोर निवड प्रक्रियेनंतर एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. हा नवा चेहरा कोण आहे, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. या नवोदित कलाकारासोबत जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या एकापेक्षा एक दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली असून दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचं आहे. ‘खाशाबा’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान