Kiara Advani: कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा, पोस्टद्वारे दिली माहिती
Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे जोडपे दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या बातमीने कियारा आणि सिद्धार्थ यांचे हृदय प्रेमाने भरून आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदीचा बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “देवाच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आम्हाला आई-बाबा होण्याची संधी मिळाली आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आले आहे.”
सोशल मीडियावर कियारा आणि सिद्धार्थची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांना एक मुलगी आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हे लोकप्रिय जोडपे आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खुश आहेत.
2025मध्ये झाली पहिली मुलगी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी फेब्रुवारी 2023मध्ये लग्न केले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कियारा अडवाणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पहिल्यांदा आई-बाबा झाल्याची माहिती दिली होती. आता ते पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.