Kiara Advani : नव्या नवरीच्या रुपात किआरा दिसतेय प्रचंड सुंदर ; गुलाबी ड्रेसमधील अभिनेत्रीचा फोटो Leak !

किआरा - सिद्धार्थ आज अडकणार विवाहबंधनात ; अभिनेत्रीचा नव्या नवरीच्या रुपातील फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला... पाहा नवरीच्या रुपातील किआराचा पहिला फोटो...

Kiara Advani : नव्या नवरीच्या रुपात किआरा दिसतेय प्रचंड सुंदर ; गुलाबी ड्रेसमधील अभिनेत्रीचा फोटो Leak !
Kiara Advani : नव्या नवरीच्या रुपात किआरा दिसतेय प्रचंड सुंदर ; गुलाबी ड्रेसमधील अभिनेत्रीचा फोटो Leak !
| Updated on: Feb 07, 2023 | 10:16 AM

Sidharth Kiara Wedding  : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) लग्न करण्याचा निर्णय घेतला. किआरा – सिद्धार्थ ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. आता दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या सर्वत्र कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ अखेर ७ फेब्रुवारी म्हणजे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाची चर्चा सुरु असताना सूर्यगढ पॅलेसमधून किआरा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये किआरा तिच्या मैत्रींणीसोबत बसलेली दिलत आहे.

सूर्यगढ पॅलेसमधून किआराचा फोटो लीक झाला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये किआरा प्रचंड सुंदर दिसत आहे. किआरा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीसुद्धा किआराचा फोटो लीक झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पण नव्या नवरीच्या रुपात किआरा प्रचंड सुंदर दिसत आहे.

 

 

किआरा हिचा फोटो लीक होण्यापूर्वी सिद्धार्थसोबत अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, संगीत सोहळ्यापूर्वी सिद्धार्थ – किआरा एकमेकांसोबत डान्स करताना दिसत होते. सध्या त्यांच्या व्हिडीओची आणि किआराच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. व्हिडीओमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहेत.

 

 

व्हिडीओमध्ये किआरा शिमरी लेहेंग्यामध्ये दिसत असून सिद्धार्थ काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सिद्धार्थ मल्होत्रच्या फॅनपेजवरुन पोस्ट करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. अखेर आज सिद्धार्थ – किआरा यांना चाहत्यांना पती – पत्नीच्या रुपात पाहता येणार आहे.

किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाहुण्यांना देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंधनकारक असणार आहे. पण तरी देखील सूर्यगढ पॅलेसमधून फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या.