AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikrant Rona: किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोना’ने कमाईच्या शर्यतीत KGF ला टाकलं मागे; जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

अनुप भंडारी दिग्दर्शित या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करून सर्वांनाच चकित केलं आहे. याशिवाय 22 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या शमशेरा या चित्रपटानेही विक्रांत रोनासमोर हात टेकले आहेत.

Vikrant Rona: किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोना'ने कमाईच्या शर्यतीत KGF ला टाकलं मागे; जाणून घ्या आतापर्यंतची कमाई
Vikrant Rona: किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोना'ने कमाईच्या शर्यतीत KGF ला टाकलं मागेImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 8:22 AM
Share

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) नुकताच प्रदर्शित झालेला ‘विक्रांत रोना’ (Vikrant Rona) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विक्रांत रोनाच्या कलेक्शनचा (Box Office Collection) आकडा सतत वाढत आहे. किच्चा सुदीप या चित्रपटातून एक ‘पॅन इंडिया स्टार’ म्हणून प्रकाशझोतात आला आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत जबरदस्त विक्रम मोडले आहेत. आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. विक्रांत रोनाने KGF या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या विक्रांत रोना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील मोठमोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून सर्वांनाच चकित केले आहे. चित्रपटाच्या सोमवारच्या कमाईने KGF चाप्टर 1 चे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, पाच दिवसांत विक्रांत रोनाने 100 कोटींचा जबरदस्त आकडा पार केला आहे. जगभरात या चित्रपटाने जवळपास कमाईचा 110 कोटींचा आकडा पार केला आहे. अनुप भंडारी दिग्दर्शित या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करून सर्वांनाच चकित केलं आहे. याशिवाय 22 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या शमशेरा या चित्रपटानेही विक्रांत रोनासमोर हात टेकले आहेत.

किचा सुदीपचा काल्पनिक अ‍ॅक्शन चित्रपट विक्रांत रोना या चित्रपटाची कथा ही एका रहस्यमय घटनेभोवती फिरणारी आहे, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा किच्चा सुदीप हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. थ्रीडी फॉरमॅटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कलेक्शनचा शानदार आकडा पार करून प्रेक्षकांना थिएटर्सच्या खुर्चीला खिळवून ठेवलं आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33 ते 35 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा गाठला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.