AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खान-किरण राव मुलाला मीडियापासून का ठेवतात दूर? आईनेच केला खुलासा

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोघं मिळून मुलगा आझादचं संगोपन करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण तिच्या मुलाविषयी व्यक्त झाली. आझादला मीडियापासून लांब का ठेवलं जातं, यामागचं कारण तिने सांगितलं आहे.

आमिर खान-किरण राव मुलाला मीडियापासून का ठेवतात दूर? आईनेच केला खुलासा
Aamir Khan and Kiran Rao with sonImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2024 | 12:07 PM
Share

मुंबई : 8 फेब्रुवारी 2024 | अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी जरी घटस्फोट घेतला असला तरी दोघांमध्ये मैत्री कायम आहे. एकमेकांच्या सुखदु:खात हे दोघं एकत्र येताना दिसतात. जुलै 2021 मध्ये आमिर आणि किरणने घटस्फोट जाहीर केला होता. या दोघांना आझाद हा मुलगा असून त्याचं संगोपन दोघं मिळून करत आहेत. आमिर आणि किरणने आझादला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही खास कार्यक्रम असल्यास किंवा कौटुंबिक कारण असल्यास तो माध्यमांसमोर येतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने यामागचं कारण सांगितलं आहे,

किरण सध्या तिच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. खुद्द किरणनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आमिरसोबतच इतर कलाकार आणि क्रू मेंबर्ससुद्धा किरणची मदत करत आहेत. प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत किरण घटस्फोटानंतर आमिरसोबतच्या मैत्रीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे तिने मुलाविषयीही काळजी व्यक्त केली.

किरण म्हणाली, “मला असं वाटतं की मुलांची एक प्रायव्हसी असते. जर मुलांना लोकांसमोर यायला आवडत असेल तर काही चिंता नाही. पण आझादला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जाणं आवडत नाही. म्हणून आम्ही त्याच्या प्रायव्हसीचा आदर करतो. आमिर आणि मी ग्लॅमरस विश्वात सहसा पार्ट्या करायला जात नाही. आम्हाला क्वचित एखाद्या कार्यक्रमात पाहिलं जातं. म्हणूनच आझादसुद्धा तसाच आहे. त्याला फारसं बाहेर जायला आवडत नाही. मलाही आवडत नाही. मुलांनी आपल्या आवडीच्या गोष्टी स्वत:च शोधल्या पाहिजेत असं मला वाटतं.”

“मी आणि आमिर जरी विभक्त झालो असलो तरी आजसुद्धा आम्ही एकमेकांची ताकद आहोत. आम्ही दोघं एकमेकांच्या आनंदाच सहभागी होतो आणि कामात मदत करतो. आजही मला आमिरसोबत काम करायला आवडतं. त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात”, असं किरण पुढे म्हणाली. आमिर खान आणि किरण राव हे 2021 मध्ये विभक्त झाले. मात्र त्यानंतरही या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खानच्या लग्नातही किरणने आवर्जून हजेरी लावली होती. हे दोघं विविध प्रोजेक्टनिमित्त एकत्र कामसुद्धा करत आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना