Athiya Shetty KL Rahul Wedding | केएल राहुल – अथिया शेट्टीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; पहा पहिली झलक..

21 जानेवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. रविवारी संगीत कार्यक्रम पार पडला आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या मुहूर्ताविषयीही माहिती समोर आली आहे.

Athiya Shetty KL Rahul Wedding | केएल राहुल - अथिया शेट्टीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; पहा पहिली झलक..
Athiya Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2023 | 10:55 AM

खंडाळा: क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाचा मंडप सजला आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली आहे. अथिया आणि राहुल आज (23 जानेवारी) खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 21 जानेवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. रविवारी संगीत कार्यक्रम पार पडला आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या मुहूर्ताविषयीही माहिती समोर आली आहे.

या लग्नसोहळ्यात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागणार आहे. याआधी विराट-अनुष्का, कतरिना-विकी, रणवीर-दीपिका, आलिया-रणबीर या सेलिब्रिटींनीही पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी ठेवली होती.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्याला रोषणाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये या फार्महाऊसमध्ये पाहुण्यांची रेलचेल पहायला मिळतेय. संगीत सेरेमनीच्या व्हिडीओमध्ये काही पाहुणे नाचताना दिसत आहेत.

पहा व्हिडीओ-

रिपोर्ट्सनुसार अथिया आणि केएल राहुल हे संध्याकाळी 4 वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्याला मोजकेच कुटुंबीय आणि पाहुणे उपस्थित राहतील. लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर संध्याकाळी 6.30 च्या सुमारास हे दोघं पापाराझींसमोर येतील.

2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनीसुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी हिंट दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं.

अथिया आणि केएल राहुल लग्नानंतर अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे शेजारी होणार आहेत, असंही कळतंय. अथिया आणि राहुलने लग्नानंतर आलिया-रणबीरच्या घरापासून जवळच असलेल्या बिल्डिंगमध्ये राहणार असल्याचं समजतंय.