Oscar 2021 | मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता, वाचा कोण आहे रिज अहमद?

| Updated on: Mar 17, 2021 | 10:20 AM

रिज अहमद हा मूळचा पाकिस्तानी असून, तो इंग्लंडमध्ये वाढला आहे. सोमवारी अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्य अभिनेत्यासाठी नामांकित होणारा तो पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे.

Oscar 2021 | मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता, वाचा कोण आहे रिज अहमद?
रिज अहमद
Follow us on

मुंबई : यंदाच्या ऑस्कर अवॉर्ड्सच्या (Oscar Nomination) नामांकित व्यक्तींची घोषणा केली आहे. हा पुरस्कार यावेळी इतिहास घडवणार आहे, कारण प्रथमच ऑस्करमधील मुख्य अभिनेत्याच्या श्रेणीत एका मुस्लिम अभिनेत्याला नामांकन देण्यात आले आहे. रिज अहमद (Actor Riz Ahmed) हा अभिनेता चित्रपट ‘साऊंड ऑफ मेटल’साठी (Sound Of Metal) या वर्षीचा बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल’ विभागात नामांकित झाला आहे. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे (know about Actor Riz Ahmed the first Muslim to be nominated in the Oscars lead actor category).

या आधी जरी मुस्लिम कलाकारांना ऑस्कर मिळाले आहेत, परंतु लीड अ‍ॅक्टर श्रेणीच्या इतिहासातील हे पहिलेच नामांकन आहे. त्यापूर्वी ऑस्कर पुरस्कार जिंकणारा महर्षला अली हा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला होता. परंतु, 2017च्या ‘मूनलाईट’ चित्रपटासाठी महर्षलाने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या विभागात हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर याच श्रेणीतील ‘द ग्रीन बुक’ चित्रपटासाठी महर्षला अलीला 2019चा ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.

अ‍ॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला आशियाई अभिनेता

तसे, 2017मध्ये मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अ‍ॅमी पुरस्कार जिंकणारा रिज अहमद पहिला मुस्लिम आणि आशियाई वंशाचा देखील पहिला व्यक्ती ठरला होता. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे आणि त्याने ‘रोग वन’, ‘वेनॉम’, ‘द सिस्टर्स ब्रदर्स’, ‘नाईटक्रॉलर’, ‘फोर लायन्स’ आणि ‘मुगल मोगली’ यासारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे.

अनेक पुरस्कारांसाठी नामांकन

यावर्षी रिझ अहमदला नामांकन मिळालेल्या ‘साऊंड ऑफ मेटल’ या चित्रपटात त्याने रूबेनची भूमिका साकारली आहे, जो एक रॉक अँड रोल ड्रमर आहे आणि आधीपासूनच व्यसनाधीन व्यक्ती आहे. या भूमिकेसाठी, रिझ अहमद याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’, ‘एसएजी पुरस्कार’, ‘स्पिरिट अवॉर्ड’ आणि ‘बाफ्टा’ या पुरस्कारांच्या स्पर्धेत प्रमुख अभिनेत्याच्या वर्गात नामांकन देण्यात आले आहे (know about Actor Riz Ahmed the first Muslim to be nominated in the Oscars lead actor category).

मूळचा पाकिस्तानी रिज अहमद

रिज अहमद हा मूळचा पाकिस्तानी असून, तो इंग्लंडमध्ये वाढला आहे. सोमवारी अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्य अभिनेत्यासाठी नामांकित होणारा तो पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. यापूर्वी मुस्लिम कलाकारांना ऑस्करसाठी नामांकन मिळालेले होते आणि पारितोषिकही जिंकले गेले होते परंतु मुख्य अभिनेता म्हणून नामांकनातील रिझ अहमद हे पहिले मुस्लिम नाव आहे.

रिजचेही भारताशीही कनेक्शन

रिज अहमदचा जन्म लंडनमध्ये ब्रिटिश पाकिस्तानी कुटुंबात झाला होता. रिझवान अहमद असे त्याचे पूर्ण नाव आहे. तो सर शाह मुहम्मद सोलोमन यांचा वंशज आहे. सर शाह मुहम्मद हे इंग्रजांच्या काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पहिले मुस्लिम सरन्यायाधीश होते.

(know about Actor Riz Ahmed the first Muslim to be nominated in the Oscars lead actor category)

हेही वाचा :

Oscar 2021 | प्रियंका चोप्रा-राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ला ऑस्कर नॉमिनेशन!

SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!