AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्ज केसमध्ये (SSR Drugs Case) रियाला जामीन देण्याच्या मुंबई कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!
रिया चक्रवर्ती
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 16, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हीच्या मागच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढणार आहेत. रियाच्या जामिनाविरूद्ध एनसीबीने (NCB) आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्ज केसमध्ये (SSR Drugs Case) रियाला जामीन देण्याच्या मुंबई कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी 18 मार्च रोजी सुनावणी होणार आहे (SSR Drugs Case Update NCB files petition in supreme court against Rhea Chakraborty bail).

एनसीबीने ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे!

एनसीबीने अलीकडेच 12 हजार पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये रिया चक्रवर्ती हिचेही नाव आहे. सेंट्रल एजन्सीने आपल्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि अन्य 32 जणांवर बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. हे एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए अंतर्गत येते आणि यानुसार किमान 10 वर्ष, तर जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.

रियाचा जबाब

केंद्रीय एजन्सीनुसार रियाने कबूल केले आहे की, ती घरात ड्रग्ज आणत होती. नोव्हेंबर 2019मध्ये याची सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर रियाने यापूर्वी शोविककडे ड्रग्ससाठी पैसेही हस्तांतरित केले होते. ज्यामुळे आता एजन्सीने रियावर ड्रग्स खरेदी आणि ड्रग्ज पुरवठा केल्याचा आरोप केला आहे.

रियाने असेही सांगितले आहे की, सुशांतला गांजा आणि मारिजुआना देण्यात आला होता. आरोपपत्रात असेही लिहिले आहे की, रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि हृषीकेश पवार हे सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज खरेदी व पुरवठा करत असत. या क्षणी यापैकी काही आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात अद्याप तपास चालू आहे.

तपासादरम्यान, मेंदूच्या मज्जातंतूंच्या पेशींच्या असामान्य आणि जास्त क्रियाकलाप नियंत्रित करण्यासाठी असलेले अ‍ॅल्प्रझोलम आणि क्लोनाझेपॅम यासह चरस, गांजा, एलएसडी, एक्स्टसी हे ड्रग्ज आढळले आहेत. हे सर्व एनडीपीएस अधिनियम कलम 20 (बी), 22, 23 अन्वये जप्त केले आहेत. याशिवाय मोठ्याप्रमाणात भारतीय व विदेशी चलनेही हस्तगत केली आहेत (SSR Drugs Case Update NCB files petition in supreme court against Rhea Chakraborty bail).

रिया चक्रवर्तीच्या वकिलाची प्रतिक्रिया

रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, एनसीबीने रिया चक्रवर्ती यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. संपूर्ण एनसीबी बॉलिवूडच्या ड्रग प्रकरणाचा खुलासा करण्यात मग्न आहे. चार्जशीट निरुपयोगी आहे, जी एनडीपीएस अधिनियम कलमांतर्गत नोंदवलेले अयोग्य पुरावे आणि विधानांच्या आधारे उभी राहिली आहे. तुफानी सिंग यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ती अनावश्यक आहे.

सीबीआयचा तपास सुरूच!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या घरी मृतावस्थेत सापडला होता. सीबीआय अद्याप या प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचाचा भाऊ शोविक यासह अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली. एनसीबीने या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी केली आहे.

(SSR Drugs Case Update NCB files petition in supreme court against Rhea Chakraborty bail)

हेही वाचा :

Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत, संघर्षमय प्रवासाला उजाळा देत म्हणाली…

Bigg Boss 15 | सलमानच्या ‘बिग बॉस’च्या घरात तुम्हालाही मिळू शकते एंट्री, वाचा प्रक्रिया आणि जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख…

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...