AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं?

जेव्हा आपण टीव्ही पाहता तेव्हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग काही मिनिटांतच संपतो. परंतु, हाच भाग चित्रित करण्यासाठी काही तास नाही, तर कित्येक दिवसदेखील लागतात.

मालिकांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हिरो-हिरोईनच्या डिझायनर कपड्यांचं काय होतं?
मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी 3 ते 4 दिवस लागतात.
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 26, 2021 | 2:06 PM
Share

मुंबई : जेव्हा आपण टीव्ही पाहता तेव्हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग काही मिनिटांतच संपतो. परंतु, हाच भाग चित्रित करण्यासाठी काही तास नाही, तर कित्येक दिवसदेखील लागतात. आवडत्या मालिका बघत असताना, हे चित्रीकरण नेमके कसे होते? कलाकारांचे कपडे कुठून येतात? किंवा त्यांना किती पैसे मिळतात?, याविषयीचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तुमच्या मनातही जर असे प्रश्न असतील तर, आज आम्ही आज तुम्हाला याची उत्तरे सांगणार आहोत (Know about TV serials shooting).

जर आपण चित्रीकरणाचा विचार केला तर, तर टीव्ही इंडस्ट्रीतील शूटिंगची शैली चित्रपटापेक्षा खूप वेगळी आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. यावेळी नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही टीव्ही अभिनेत्री गीतांजली मिश्राशी संवाद साधला. त्यांनी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. चला तर, जाणून घेऊया टीव्ही शूटिंगबद्दल त्यांनी काय सांगितले…

एक भाग चित्रीत करण्यासाठी किती वेळ लागतो?

‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री गीतांजली म्हणाल्या, ‘हे त्या मालिकेवर अवलंबून आहे. ज्या मालिका डेली सोप आहेत, त्यांचे शूट बहुतेक इनडोअर असते. त्यामुळे चित्रिकरणाचे लोकेशन एकच तसेच, तिथेच प्रकाश योजना केलेली असते. तीन कॅमेऱ्यांचे शूटिंग सुरू झाले की, एका दिवसात एका भागाचे चित्रीकरण आरामात पार पडते. तर, ‘नागिन’सारख्या मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी 3 ते 4 दिवस लागतात. कारण यात व्हीएफएक्सवरही काम केले जाते. दुसरीकडे, क्राइम पेट्रोल सारख्या शोच्या चित्रीकरणाला बराच वेळ लागतो, कारण त्यामध्ये आउटडोअर शूट अधिक असते.

प्रदर्शित होण्याच्या किती दिवस आधी एपिसोड शूट केले जातात?

आठवड्यातून 5 ते 6 दिवस टेलीव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण सतत सुरु असते. यामुळे, केवळ दोन-तीन दिवसांचे भाग बॅकअपमध्ये राहतात. पण, पात्रं जास्त असतील तर शूटिंग थांबत नाही. म्हणून त्यांना एपिसोड कमी पडण्याची समस्या येत नाही.

स्क्रिप्ट आधीच लिहिलेली असते का?

अभिनेत्री म्हणते, ‘चित्रपटाची स्क्रिप्ट बर्‍याच महिन्यांपूर्वी लिहिलेली असते. पण संवाद हे चित्रीकरणाच्या दिवशीच मिळतात. त्याच दिवशी सीन फायनल केले जातात. ही सगळी प्रक्रिया टीआरपी आणि चॅनेलच्या धोरणावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात दररोज हे बदल केले जातात. अशा परिस्थितीत टीव्ही मालिकांचे शुटिंग हे चित्रपटांपेक्षा खूप वेगळे आहे. चॅनेल प्रत्येक आठवड्याच्या टीआरपी आकड्यांच्या आधारे पुढील आठवड्यातील कामाचा निर्णय घेते (Know about TV serials shooting).

हिरो-हिरोईनचे डिझायनर कपडे कुठून येतात?

टीव्ही मालिकेतील पात्रांचे कपडे प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने दिले जातात. प्रॉडक्शन हाऊस कपडे भाड्याने घेते आणि ते अभिनेत्री किंवा अभिनेत्यास त्या भागापुरते दिले जातात. अभिनेत्रींचे पोशाख हे कॉमन आकाराचे असतात. शूटिंगपूर्वी अभिनेत्रींच्या सोयीनुसार अल्टर केले जातात. कधीकधी एखादे पात्र केवळ एकाच दिवसापुरते असते, अशावेळी त्यांना स्वतःचे कपडे आणण्यास देखील सांगितले जाते. बऱ्याचदा प्रॉडक्शन हाऊसमधूनच कपडे उपलब्ध करून दिले जातात. मालिकेचे सर्वाधिक बजेट हे कपड्यांवरच खर्च होते.

कलाकार दिवसाला किती तास काम करतात?

गीतांजली म्हणतात, ‘मालिकेचे चित्रीकरण करताना दिवसाला 13 तासांची शिफ्ट असते. तसेच दिवसभरात बऱ्याच शिफ्ट असतात आणि कधीकधी नाईट शिफ्टमध्येही काम करावे लागते. अशा परिस्थितीत, अभिनेत्याला दिवसभर सुमारे 15 तास काम करावे लागते. त्याच वेळी, बरेच कलाकार शूटिंगच्या जागेपासून बरेच दूर राहतात, अशा कलाकारांसाठी हे खूप अवघड आहे.’(Know about TV serials shooting)

कलाकारांना पैसे कसे मिळतात?

कोणतेही चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या 90 दिवसानंतर कलाकारांना मानधन मिळते. जसे की, आपण जानेवारीमध्ये शूटिंग करीत असाल तर आपल्याला तीन महिन्यांनंतर म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्ये पैसे मिळतील. मग ते काम 1 दिवसांचे असो वा महिनाभराचे, 90 दिवसानंतरच त्याचा मोबदला मिळतो. हे मानधन दिवसांच्या आधारावर दिले जातात. जर आपण एका महिन्यात 10 दिवस काम करत असाल, तर आपल्याला केवळ 10 दिवसांचे पैसे मिळतील.

अभिनेत्रींना येणाऱ्या अडचणी कोणत्या?

मालिका सतत सुरु असल्याने, बर्‍याच वेळा अभिनेत्रीने सतत शूटिंग करावे लागते. याचा त्यांच्या त्वचेवर खूप परिणाम होतो. तसेच शूट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्वचेवर हेवी मेकअप लावला जातो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच शूटिंगदरम्यान, कलाकारांना विग लावावा लागतो आणि विग लावून काम केल्यामुळे अभिनेत्रींचे 20 टक्के केस गळतात. या समस्या अतिशय वेदनादायी ठरतात.

(Know about TV serials shooting)

हेही वाचा :

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?