‘कांटा चुभा मेरे पांव में’ गाजलं, ‘काँटेवाली सुषमादेवी’ म्हणून ओळख मिळाली; सुषमादेवी काय सांगतात वाचाच!

आंबेडकरी चळवळीतील अत्यंत दमदार आणि खणखणीत आवाज असलेल्या गायिका म्हणून सुषमादेवींची ओळख आहे. (know how change sushma devi's life after kanta chubha mere paon mein song)

'कांटा चुभा मेरे पांव में' गाजलं, 'काँटेवाली सुषमादेवी' म्हणून ओळख मिळाली; सुषमादेवी काय सांगतात वाचाच!
sushma devi
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 3:14 PM

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील अत्यंत दमदार आणि खणखणीत आवाज असलेल्या गायिका म्हणून सुषमादेवींची ओळख आहे. सुषमादेवींनी केवळ आंबेडकरी गाणीच गायली नाही, तर गाण्यातील बहुतेक प्रकार हाताळले आहेत. अगदी कव्वालीपासून ते गझलापर्यंत आणि बिरहा, हम्द, नाद, मनकबतपासून ते ठुमरीपर्यंत अनेक गाणी त्यांनी गायली आहे. गाण्याची प्रचंड जाण, मधूर आवाज यामुळे त्या ‘भीमकोकीळा’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अनेक गाजलेल्या गाण्यांबरोबर त्यांची ओळखही बदलत गेली आहे. त्याचेच हे काही किस्से. (know how change sushma devi’s life after kanta chubha mere paon mein song)

नावापुढे ‘देवी’ कसं आलं?

सुषमादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे झाला. त्यांचे खरे नाव शोभा. पण पतीच्या घरी सुषमा हे नाव देण्यात आलं. पुढे कव्वालीत त्यांना सुषमा देवी म्हणून संबोधलं जाऊ लागलं. गायिका शीलादेवींच्या नावावरून त्यांनी आपल्या नावा पुढे देवी चिटकवलं आणि त्या सुषमा देवी झाल्या. त्यांची मोठी बहीण लक्ष्मी आणि छोटी बहीण मीना यांनीही सुषमा देवींप्रमाणे आपल्या नावापुढे ‘देवी’ चिटकवून गायन क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला.

शुभा गुर्टूंच्या दोन ठुमऱ्या गायल्या अन्…

इयत्ता दुसरीपर्यंत शिकलेल्या या गायिकेला अत्यंत गोड गळा लाभला आहे. त्यांचा आवाज मधूर आहे. स्वरांच्या आरोह-अवरोहांपासून गाण्यांमध्या जागा कशी काढावी? याचं त्यांना संपूर्ण ज्ञान आहे. त्या स्वत: गाण्यांना चाली बांधतात. त्यांचे पती विश्वकांत महेशकर हे संगीतकार असल्याने ते सुद्धा त्यांना गाण्यांना चाली बांधून द्यायचे. एकदा त्या स्टुडिओत गेल्या होत्या. अॅरेंजरने त्यांना ठुमरी गाणार का म्हणून विचारलं. सुषमादेवींनी हो म्हणून सांगितलं. तेव्हा अॅरेंजरने त्यांना शुभा गुर्टूंच्या दोन ठुमऱ्या गायला दिल्या. ‘सज्जोराणी’ सिनेमातील या ठुमऱ्या गायला दिल्या. सुषमादेवींनी कोणताही रियाज न करता त्या दोन ठुमऱ्या तेवढ्याच ताकदीने गायल्या. त्यामुळे अॅरेंजरही चकीत झाला.

नथनीयोने हाय राम, बडा दु:ख दिना…

आणि

कही हो ना माहौल में हल्ला, किवडीया ना खटकाना…

‘शोभा सोलापूरवाली’

सुषमादेवी यांनी केवळ ठुमऱ्याच नाही तर कव्वाली, गझला, लोकगीतं, भीमगीतं, भक्तीगीतं, भजनं, बिरहा, हम्द, नाद, मनकबत आणि ऊरुसाची गाणीही गायली आहेत. हिंदी-ऊर्दू कव्वाल्या गात असल्यामुळे नागपूरमध्ये त्यांना शोभा सोलापूरवालीही म्हटलं जायचं. त्यांच्या आई सोलापूरच्या आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये सुषमादेवी ‘शोभा सोलापूरवाली’ म्हणून फेमस होत्या. सुषमादेवींच्या गाण्याचं वैशिष्ट्ये त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे क्लासिकल ढंग आणि उत्तम सादरीकरण होय. पब्लिकची मानसिकता जाणून घेऊनच त्या आपलं गाणं सादर करत असतात.

‘काँटेवाली सुषमा’

काँटा चुभा मेरे पांव में, बेदर्दी तेरे गाव में…

या गाण्याने सुषमादेवींना प्रचंड यश मिळवून दिलं. इतकं की महाराष्ट्र-कर्नाटकात ‘काँटेवाली सुषमादेवी’ म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. तर मुस्लिम समाजात त्यांना ‘परबीन साबा’ म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं. यावरून त्यांची लोकप्रियता किती होती हे लक्षात येतं. परवीन साबांबरोबर अनेक भेटी झाल्याचंही त्या सांगतात. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know how change sushma devi’s life after kanta chubha mere paon mein song)

संबंधित बातम्या:

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

पत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही ‘ही’ गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर

वडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या?

(know how change sushma devi’s life after kanta chubha mere paon mein song)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.