‘टायगर 3’ची जादू नाहीच, सलमान खान याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ, घ्या जाणून एकून कलेक्शन

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाने धमाकेदार सुरूवात केली. विशेष म्हणजे सलमान खान याचा हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नक्कीच आहे. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

'टायगर 3'ची जादू नाहीच, सलमान खान याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ, घ्या जाणून एकून कलेक्शन
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 3:40 PM

मुंबई : सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने ओपनिंगही जबरदस्त केली. मात्र, आता कुठेतरी या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे बघायला मिळतंय. चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाहीये. जगभरातून चित्रपटाने 400 कोटींपेक्षाही अधिक कमाई केलीये. मात्र, चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये सतत चढउतार हे बघायला मिळत आहेत. आता नुकताच टायगर 3 चित्रपटाचे 17 व्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले. 17 व्या दिवशी चित्रपटाला फार जास्त काही धमाका करण्यात यश मिळाले नाही.

विशेष म्हणजे टायगर 3 चित्रपटाची ओपनिंग ही जबरदस्त ठरली. टायगर 3 चित्रपटाने ओपनिंग डेला जगभरातून तब्बल 94 कोटींचे कलेक्शन केले. त्यानंतर चार दिवसांनीच चित्रपटाचे कलेक्शन हे कमी झाले. निर्मात्यांनी एक आशा होती की, पुढील काही दिवसांमध्ये परत एकदा चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ नक्कीच होईल. मात्र, तसे काही झाले नाही.

सलमान खान याच्या चित्रपटाने जगभरातून 450 कोटींच्या आसपास कमाई केल्याचे सांगितले जातंय. 17 व्या दिवशीचे कलेक्शन मिळून चित्रपटाने जगभरातून 447 कलेक्शन केले. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाला फार काही धमाका करण्यात यश मिळेल, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे.

1 डिसेंबर रोजी विकी काैशल याचा सॅम बहादूर आणि रणबीर कपूर याचा अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये विकी काैशल याच्या चित्रपटाबद्दल कमालीची क्रेझ बघायला मिळतंय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विकी काैशल हा दिसत आहे. रणबीर कपूर हा देखील त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.