Koffee With Karan 7: एक्सबाबत सारा अली खानचं उत्तर ऐकून जान्हवीला हसू अनावर; करण जोहरने घेतली दोघींची फिरकी

| Updated on: Jul 12, 2022 | 5:53 PM

या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करणने दोघांना त्यांच्या क्रशबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी सारा अली खान आणि जान्हवी कपूरने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Koffee With Karan 7: एक्सबाबत सारा अली खानचं उत्तर ऐकून जान्हवीला हसू अनावर; करण जोहरने घेतली दोघींची फिरकी
Janhvi Kapoor and Sara Ali Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनच्या (koffee with karan 7) दुसऱ्या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट पाहुणे म्हणून आले होते. आता दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या दोन खास मैत्रिणी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करणने दोघांना त्यांच्या क्रशबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी सारा अली खान आणि जान्हवी कपूरने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

टीझर व्हिडिओमध्ये करण साराला विचारतो की सध्या तिला कोणावर क्रश आहे? त्यावर उत्तर देताना सारा ही विजय देवरकोंडाचं नाव घेते. ते ऐकून तिच्या शेजारी बसलेल्या जान्हवीला हसू अनावर होतं. यानंतर करण जान्हवीला उद्देशून काही म्हणतो, तितक्यात साराने जान्हवीला विचारले की तिला विजय देवरकोंडा आवडतो का?

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

या सिझनमध्ये करणने साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयीही प्रश्न विचारला आहे. गेल्या सिझनमध्ये जेव्हा साराने वडील सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती, तेव्हा तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. यावरूनच करणने तिला प्रश्न विचारला की ‘तुझा एक्स हा एक्स का बनला आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देताना सारा मस्करीत म्हणते, “कारण तो सर्वांचा एक्स आहे”. हे ऐकून जान्हवी आणि करण जोरजोरात हसू लागतात.

‘कॉफी विथ करण 7’चा दुसरा एपिसोड कधी येणार?
कॉफी विथ करण सीझन 7 हा चॅट शो आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत गेल्या आठवड्यात सुरू झाला होता. पुढचा एपिसोड 14 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एपिसोड गुरुवारी, 14 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता Disney+Hotstar वर तुम्ही पाहू शकता.