koffee with karan: आर्यन खानच्या अटकेबाबत बोलताना गौरी खान म्हणते, तो काळ….

मी तुला सगळ्यांपेक्षा जास्त ताकदीने बाहेर येताना पाहिले आहे. जेव्हा कुटुंबे अशा परिस्थितीतून जातात तेव्हा कठीण प्रसंग हाताळण्याच्या तुझ्या हातोटी बद्दल काय म्हणणे आहे?

koffee with karan: आर्यन खानच्या अटकेबाबत बोलताना गौरी खान म्हणते, तो काळ....
Koffe with karan
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2022 | 11:00 AM

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बॉलीवूड (Bollywood) कलाकारांच्याबद्दल तसेच त्याच्या खासगी आयुष्यातील गॉसिपिंगसाठी करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (koffee with karan‘) चॅट शो प्रसिद्ध आहे. आता ‘कॉफी विथ करण-7’ च्या सीझन चर्चेत आहे. यामध्ये इंटिरियर डिझायनर आणि अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने (Gauri Khan) सातव्या सीझन मध्ये हजेरी लावली होती. या 12 व्या एपिसोडमध्ये महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत  सहभागी झाली होती . यावेळी तिने अनेक गोष्टींबाबत चर्चा केली. त्यावेळी ती मुलगा आर्यन खानच्या ड्रग केसबद्दल बोलली.

काय होते प्रकरण

गेल्या वर्षी आर्यन खानला मुंबई पोलिसांनी एका क्रूझ जहाजावर ड्रग्ज घेऊन जात असल्याच्या संशयावरून अटक केली होती. त्याने काही आठवडे तुरुंगात घालवले आणि अखेरीस आर्यन खानची त्याच्याविरुद्ध पुराव्या अभावी जामिनावर सुटका झाली.  एपिसोडमध्ये करण जोहरने गौरी खानशी मुलगा आर्यन खानच्या अटकेबद्दल त्याच्या कुटुंबाने त्या वेळी या प्रकरणाचा कसा सामना केला याबद्दल बोलली आहे.

हे सोपे नव्हते पण गौरी, मी तुला सगळ्यांपेक्षा जास्त ताकदीने बाहेर येताना पाहिले आहे. जेव्हा कुटुंबे अशा परिस्थितीतून जातात तेव्हा कठीण प्रसंग हाताळण्याच्या तुझ्या हातोटी बद्दल काय म्हणणे आहे? असा प्रश्न कारण जोहरने गौरी खानला विचारला

गौरी खानने उत्तर दिले, ‘होय, एक कुटुंब म्हणून आम्ही यातून गेलो आहोत. मला वाटते एक आई म्हणून, पालक म्हणून, आम्ही जे काही अनुभवलो आहोत, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण आज जिथे आम्ही एक कुटुंब म्हणून उभे आहोत, मी म्हणू शकतो की आम्ही एका चांगल्या ठिकाणी आहोत, या काळात आम्हाला सर्वांकडून प्रेम मिळाले.

आमच्या सर्व मित्रांकडूनच नव्हे तर आम्हाला माहित नसलेल्या अनेक लोकांचे संदेश आम्हाला आले. त्यासाठी त्या सगळ्यांचे मला आभार मानू वाटतात . या काळात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी ऋणी आहे,  असेही ती म्हणाली आहे.