AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी..., उद्योजकाच्या बायकोने केलेल्या अशा वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिची टिका देखील केली... जाणून घ्या, ती नेमकं काय म्हणाली...

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी..., उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Jul 06, 2026 | 10:32 AM
Share

Lock Upp 2 : गरिबांच्या मुलांमुळे गरिबी वाढेल, पण श्रीमंतांच्या मुलांमुळे श्रीमंती वाढते… असं वक्तव्य माधुरी जैन हिने केलं आहे. जी उद्योजक अश्नीर ग्रोवर याची पत्नी आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये माधुरी हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. माधुरी हिने केलेलं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी माधुरी आणि तिचे पती अश्नीर यांना तिसरं मुल हवं होतं. पण कुटुंबियांनी पाठिंबा नसल्यामुळे आणि काही मेडीकल अडचणींमुळे त्यांना तिसऱ्या मुलाचं जगात करता आलं नाही…

मात्र, या वादाचे मूळ कारण ही बाब नसून त्यानंतर माधुरीने उच्चारलेले शब्द होते, ज्यांनी अनेकांना धक्का दिला. माधुरी म्हणाली, “तिसरं अपत्य तुम्हाला तरुण ठेवतं. जर तुम्ही श्रीमंत लोकांकडे पाहिलं, ज्यात शाहरुख खानचाही समावेश आहे, तर त्यांना तिसरं अपत्य आहे. ‘हम दो हमारे दो…’ ही म्हण सर्वांनाच लागू पडत नाही. श्रीमंत लोकांना जितकी जास्त मुले असतात, तितकी त्यांची संपत्ती वाढते; तर गरिबांना जितकी जास्त मुले असतात, तितकी त्यांची गरिबी वाढते.” या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला.

माधुरी जैन ग्रोव्हर हिच्या विधानावर तीव्र टीका

माधुरीच्या या वक्तव्यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. एका नेटकरी तिव्र शब्दात टीका करत म्हणाला, “स्पष्टच आहे की, या महिलेला अर्थव्यवस्था किंवा लोकसंख्येबाबत काहीही ज्ञान नाही. यावरून हेच ​​दिसून येतं की, उच्चभ्रू वर्गाकडे किती मूलभूत माहितीचा अभाव असतो. लक्षात ठेवा, सामान्य जनताच यांसारख्या लोकांना मत करते.”, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘माधुरी अश्नीर ग्रोवर यांच्या किव येते, त्यांचं हे वक्तव्य श्रीमंतांच्या घमंडीचं सर्वात वाईट रुप आहे. त्यांचे विचार त्यांच्या बॅक बॅलेन्सपर्यंत मर्यादित आहेत. तर, श्रीमंतांकडून होणारं शोषण ही कधीच समस्या नसते; समस्या असते ती केवळ गरिबांचं अस्तित्व…

‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) बद्दल सांगायचं झालं तर, रिअ‍ॅलिटी शोच्या नुकताच झालेल्या एका भागात, अभिनेत्री कंगना राणौतने विशेष पाहुणी म्हणून हजेरी लावली. तिने स्पर्धकांना खडे बोल सुनावले आणि त्यांना आपली कामगिरी सुधारण्याचं आवाहन केलं. दरम्यान, श्रेष्ठा अय्यर स्पर्धेतून बाहेर पडली; ‘लॉक अप 2’ मधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?