AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Upp : ‘माझा विनयभंग झालाय…’, नॅशनल टीव्हीवर राम कपूरचा धक्कादायक खुलासा

Lock Upp : 'लॉकअप सीजन 2' मध्ये अभिनेता राम कपूर याने स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रॉमा सांगितला आहे. माझा देखील विनयभंग झाला आहे... असा खुलासा अभिनेत्याने नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राम कपूर याची चर्चा रंगली आहे.

Lock Upp : 'माझा विनयभंग झालाय...', नॅशनल टीव्हीवर राम कपूरचा धक्कादायक खुलासा
अभिनेता राम कपूर
| Updated on: Jul 12, 2026 | 2:15 PM
Share

Ram Kapoor Secret : टीव्ही क्वीन एकता कपूर हिच्या ‘लॉक अप 2’ शोमध्ये स्पर्धकांचे सिक्रेट समोर येत आहेत, जे ऐकून प्रेक्षक देखील हैराण होत आहेत. आता शोमध्ये अभिनेता राम कपूर याने धक्कादायक खुलासा केला आहे आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये राम कपूर याने जगासमोर स्वतःचं मोठं गुपित उघड केलं आहे. लहानपणी घडलेली घटना सांगत राम कपूरने सांगितलं की, लहानपणी त्याचा विनयभंग झालेला. तेव्हा अभिनेता फक्त 13 वर्षांचा होता. अभिनेत्यानं असं देखील सांगितलं की, ही घटना फक्त त्याची पत्नी गौतमी कपूर हिला माहिती आहे. बाकी कोणालाच अभिनेत्याने याबद्दल सांगितलं नव्हतं…

‘लॉक अप 2’ (Lock Upp) च्या ‘जजमेंट डे’ (Judgment Day) या भागात, जेव्हा रियाझ अली, श्रेया कालरा आणि राम कपूर ‘डेंजर झोन’मध्ये आले, तेव्हा राम कपूर याने बझर दाबून जगासमोर स्वतःचं गुपित उघड करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत भावूक होऊन अभिनेता म्हणाला, “मी अवघ्या 13 वर्षांचा असताना शाळेत माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यावेळी मी हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि दहावीत शिकणाऱ्या एका सिनियरने माझ्यावर तो अत्याचार केला होता; जरी त्याने नंतर माफी मागितली, तरी त्या अनुभवातून सावरण्यासाठी मला खूप मोठा काळ जावा लागला.”

‘माझ्या आयुष्यातील एवढं मोठं सिक्रेट मी फक्त माझी पत्नी गौतमी कपूर हिला सांगितलं आहे. तिच्याशिवाय हे कोणाला माहिती देखील नाही. माझ्या आई – वडिलांना देखील याबद्दल माहिती नाही. मी माझ्या मुलांना देखील याबद्दल काहीही सांगितलं नाही. नॅशलन टीव्हीवर सांगण्याची हिंमत देखील माझी कधीच झाली नाही.’, असं देखील अभिनेता राम कपूर याने सांगितलं आहे.

राम कपूर यांनी आपला हा वैयक्तिक अनुभव सांगितल्याबरोबरच शोमधील इतर स्पर्धक अवाक् झाले आणि तिथलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. रामचे दुःख ऐकून स्पर्धक सुफी मोतीवाला याला अश्रू आवरता आले नाहीत आणि तो शोमध्येच ढसाढसा रडू लागला. स्वतःला सावरल्यानंतर, सूफीने राम कपूरला मिठी मारली आणि या संवेदनशील मुद्द्यावर इतकं धैर्य दाखवून आपल्या समुदायासाठी व समाजासाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांनी राम यांच्या धैर्याला सलाम केला.

Follow Us